Join us  

टीम इंडियाची 'धुलाई' करणाऱ्या फलंदाजावर ICC ची कारवाई; नेमकं काय घडले ते घ्या जाणून

IND vs WI : वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात २ विकेट्स राखून विजय मिळवताना भारताला मालिकेत २-० असे पिछाडीवर ढकलले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 7:44 PM

Open in App

IND vs WI : वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात २ विकेट्स राखून विजय मिळवताना भारताला मालिकेत २-० असे पिछाडीवर ढकलले. २०१६ नंतर प्रथमच वेस्ट इंडिजने सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत भारताला पराभूत केले. भारताच्या ७ बाद १५२ धावांचा पाठलाग करताना निकोलस पूरन ( ६७)ने वादळी खेळी केली. त्याने ४० चेंडूंत ६ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचले. अटीतटीच्या या सामन्यात अकिल होसेन ( १६*) व अल्झारी जोसेफ ( १०*) यांनी किल्ला लढवला अन् १८.५ षटकांत विंडीजला सामना जिंकून दिला. या सामन्यातील प्लेअर ऑफ दी मॅच निकोलसवर ICC ने आज कारवाई केली.

निकोलस पूरन याला भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० मध्ये लेव्हल १ ICC आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पूरनने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम २.७ चे उल्लंघन केले, जे आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीकेशी संबंधित आहे. भारताच्या डावाच्या चौथ्या षटकात LBW निर्णयाचा आढावा घेतल्यानंतर ही घटना घडली. पूरनने पंचांवर टीका केली की, त्याला स्पष्टपणे नॉट आउट वाटत असलेल्या निर्णयासाठी DRSचा वापर करावा लागला. 

पूरनने त्याची चूक मान्य केली आहे. मैदानावरील पंच लेस्ली रेफर आणि निगेल डुगुइड, तिसरे पंच ग्रेगरी ब्रॅथवेट आणि चौथे अधिकारी पॅट्रिक गस्टार्ड यांनी दिलेले निर्बंध स्वीकारल्यानंतर सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी औपचारिक सुनावणीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, पूरनच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे, जो २४ महिन्यांच्या कालावधीतील त्याचा पहिला गुन्हा होता. लेव्हल १ च्या उल्लंघनात किमान दंड, खेळाडूच्या मॅच फीमधून जास्तीत जास्त ५०% कपातीचा दंड आणि खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स जोडले जातात. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजआयसीसी
Open in App