नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत यजमान भारताने एक डाव व 272 धावांनी दणदणीत विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तीन दिवसांत भारताने हा सामना जिंकला. भारताने पहिला डाव 649 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजच्या संघाला दोन्ही डावात मिळूनही ही धावसंख्या गाठता आली नाही. त्यानंतर भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने विंडीज संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला, परंतु त्याला वेस्ट इंडिजच्या टिनो बेस्टकडून सडेतोड उत्तर मिळाले.
विंडीज संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हरभजन सिंगने ट्विट केले. तो म्हणाला,''वेस्ट इंडिज संघाचा मान राखून तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छीतो... विंडीजचा हा संघ रणजी करंडकाच्या प्लेट गटातून उपांत्यपूर्व फेरीत आला आहे का? एलिट खेळाडूंकडून अशी कामगिरी होणार नाही.''
या ट्विटनंतर हरभजन सिंगला संमिश्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. त्यामधे वेस्ट इंडिजच्या टिनो बेस्टने दिलेला रिप्लाय सर्वोत्तम होता. त्याने लिहिले की,'' इंग्लंड दौऱ्यात असा अहंकारी ट्विट केला नाहीस... असो विंडीजचा हा युवा संघ शिकत आहे.''
Web Title: IND vs WI : Windies tino best gives a fitting reply to Harbhajan Singh for his criticisms on visitors
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.