गुवाहाटी : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात 8 विकेट राखून विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या 322 धावांचा पाठलाग करताना विराट व रोहित या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 246 धावांची भागीदारी केली. विराटने 107 चेंडूंत 21 चौकार आणि 2 षटकार खेचून 140 धावांची खेळी केली. रोहितने 117 चेंडूंत 15 चौकार व 8 षटकार खेचून नाबाद 152 धावांची खेळी केली. भारताने हे लक्ष्य 42.1 षटकांत सहज पार केले.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजने सहाच्या सरासरीने धावांचा वेग कायम राखताना 50 षटकांत 8 बाद 322 धावा उभ्या केल्या. 2015 नंतर 17 सामन्यांत विंडीज संघाला प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्यांदाच तीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला आहे. भारताने हा सामना सहज जिंकला.
LIVE UPDATE:
- विराट कोहलीची झुंजार खेळी देवेंद्र बिशून संपुष्टात आणली.
- रोहित शर्मानेही 84 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याचे हे वन डेतील 20 वे शतक ठरले
- विराटने अफलातून षटकार खेचून भारताला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला
- विराट कोहलीचे खणखणीत शतक, वन डेतील 36 वे शतक
- रोहित शर्माची अर्धशतकी खेळी
- रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शतकी भागीदारी
-विराट कोहलीने 37 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
- रोहित व विराट या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
- धवन माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी फटकेबाजी केली. त्यांनी 6 षटकांत 41 धावा उभ्या केल्या.
- वेस्ट इंडिजकडून पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळणाऱ्या ओशाने थॉमसने भारताचा सलामीवीर शिखर धवनला त्रिफळाचीत केले. 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 10 धावांवर पहिला धक्का बसला.
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात रिषभ पंतचे पदार्पण झाले असून त्याला यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने कॅप दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने चांगली फलंदाजी केली. शिमरोन हेतमेयर ( 106) आणि कायरेन पॉवेल (51) यांच्या उपयुक्त खेळीला शाय होप्स ( 32) आणि कर्णधार जेसन होल्डर ( 38) यांनी चांगली साथ दिली. विंडीजने सहाच्या सरासरीने धावांचा वेग कायम राखताना 50 षटकांत 8 बाद 322 धावा उभ्या केल्या. 2015 नंतर 17 सामन्यांत विंडीज संघाला प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्यांदाच तीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला आहे.
- हेतमेयर बाद झाल्यानंतरही वेस्ट इंडिज संघाने धावांची गती कायम राखताना थोडी अडचण जाणवली, परंतु त्यांनी भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
- शिमरोन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने 38 षटकांत 5 बाद 245 धावा केल्या
- वेस्ट इंडिजने पाचच्या सरासरीने दोनशे धावांचा पल्ला पार केला
- शिमरोन हेटमेयरने अर्धशतकी खेळी करताना विंडीजचा डाव सावरला
- एका बाजूने वेस्ट इंडिज संघाचा डाव सावरणारा शाय होपही माघारी परतला. मोहम्मद शमीने दुसरी विकेट घेतली
- 200 वा सामना खेळणारा मार्लोन सॅम्युअल्सचा अडथळा युजवेंद्र चहलकडून दूर
- अर्धशतकी खेळी करणारा पॉवेल बाद, विंडीजला दुसरा धक्का
- पॉवेलने 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
- कायरेन पॉवेल आणि शाय होप्स यांनी विंडीजचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
- वेस्ट इंडिजला पहिला धक्का. मोहम्मद शमीने विंडीजच्या चंद्रपॉल हेमराजचा त्रिफळा उडवला.
असा अाहे संघ
Web Title: IND Vs WIN 1st One Day: India won toss, first fielding, Pant's debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.