गुवाहाटी : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात 8 विकेट राखून विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या 322 धावांचा पाठलाग करताना विराट व रोहित या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 246 धावांची भागीदारी केली. विराटने 107 चेंडूंत 21 चौकार आणि 2 षटकार खेचून 140 धावांची खेळी केली. रोहितने 117 चेंडूंत 15 चौकार व 8 षटकार खेचून नाबाद 152 धावांची खेळी केली. भारताने हे लक्ष्य 42.1 षटकांत सहज पार केले.
LIVE UPDATE:
- विराट कोहलीची झुंजार खेळी देवेंद्र बिशून संपुष्टात आणली.
- विराट कोहलीचे खणखणीत शतक, वन डेतील 36 वे शतक
- रोहित शर्माची अर्धशतकी खेळी
- रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शतकी भागीदारी
- रोहित व विराट या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
- धवन माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी फटकेबाजी केली. त्यांनी 6 षटकांत 41 धावा उभ्या केल्या.
- वेस्ट इंडिजकडून पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळणाऱ्या ओशाने थॉमसने भारताचा सलामीवीर शिखर धवनला त्रिफळाचीत केले. 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 10 धावांवर पहिला धक्का बसला.
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात रिषभ पंतचे पदार्पण झाले असून त्याला यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने कॅप दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने चांगली फलंदाजी केली. शिमरोन हेतमेयर ( 106) आणि कायरेन पॉवेल (51) यांच्या उपयुक्त खेळीला शाय होप्स ( 32) आणि कर्णधार जेसन होल्डर ( 38) यांनी चांगली साथ दिली. विंडीजने सहाच्या सरासरीने धावांचा वेग कायम राखताना 50 षटकांत 8 बाद 322 धावा उभ्या केल्या. 2015 नंतर 17 सामन्यांत विंडीज संघाला प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्यांदाच तीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला आहे.
- हेतमेयर बाद झाल्यानंतरही वेस्ट इंडिज संघाने धावांची गती कायम राखताना थोडी अडचण जाणवली, परंतु त्यांनी भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
- शिमरोन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने 38 षटकांत 5 बाद 245 धावा केल्या
- शिमरोन हेटमेयरने अर्धशतकी खेळी करताना विंडीजचा डाव सावरला
- अर्धशतकी खेळी करणारा पॉवेल बाद, विंडीजला दुसरा धक्का
- कायरेन पॉवेल आणि शाय होप्स यांनी विंडीजचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
असा अाहे संघ