गुवाहाटी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याचे हे वन डेतील 36 वे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकले. सचिनला 36 वन डे शतकं पूर्ण करण्यासाठी 311 सामने खेळावे लागले होते. विराटने 204 सामन्यांत 36 शतकं पूर्ण केली.
या शतकी खेळीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 60 शतकं झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने वन डेत 36 शतकं आणि कसोटीत 24 शतकं झळकावली आहेत. या कामगिरीसह त्याने 60 आंतरराष्ट्रीय शतकं करणाऱ्या फलंदाजांमध्ये एन्ट्री घेतली आहे. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर (100), रिकी पाँटिंग (71), कुमार संगकारा (63) आणि जॅक कॅलिस (62) आघाडीवर आहेत.
Web Title: IND Vs WIN 1st One Day: Virat Kohli's complet 60th international hundred
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.