विशाखापट्टणमः भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयपथावर कायम राहण्यासाठी ते सज्ज आहेत, तर पराभवातून शिकवण घेत विंडीजचा संघा पुनरागमनासाठी आतुर आहे. जय-पराजयाच्या निकालापलीकडे भारतीय संघासाठी हा सामना विशेष महत्त्वाचा आहे. वन डे क्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेली कामगिरी आज भारतीय संघ करणार आहे.
लिड्स येथे 13 जुलै 1974 साली भारतीय संघाने पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळला. त्यानंतर 44 वर्षांच्या कालखंडात भारतीय संघाने अनेक विक्रमांची नोंद केली, अनेक ऐतिहासिक जेतेपद जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) वन डे क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या मालिकेत निर्भेळ यश मिळवून भारताला अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. मात्र, याही पलिकडे विशाखापट्टणम येथील सामना क्रिकेट इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
50-50 षटकांच्या या क्रिकेट प्रकारात 950 सामने खेळणारा भारत हा पहिला संघ ठरणार आहे. सर्वाधिक वन डे सामने खेळण्याचा विक्रम भारताने याआधीच आपल्या नावावर केला आहे. पण, सर्वाधिक विजय मिळवण्याच मान ऑस्ट्रेलियाला जातो. त्यांनी 916 सामन्यांत 556 विजय मिळवले आहेत. भारताने 949 सामन्यांत 490 विजय मिळवले आहेत.
Web Title: IND Vs WIN 2nd One Day: Indian Team ready for creat history at Visakhapatnam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.