ठळक मुद्दे भारताचा कर्णधार विराट कोहली माणूस नाही, असे वक्तव्य मंगळवारी एका क्रिकेटपटूने केले होते. या गोष्टीचा प्रत्यय बुधवारी क्रिकेट जगताला आला.
विशाखापट्टणम : भारताचा कर्णधार विराट कोहली माणूस नाही, असे वक्तव्य मंगळवारी एका क्रिकेटपटूने केले होते. या गोष्टीचा प्रत्यय बुधवारी क्रिकेट जगताला आला. कारण कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोहलीने 9 हजार ते दहा हजार हा पल्ला फक्त अकरा डावांमध्ये गाठला आहे.
कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 धावांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे. सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता क्रिकेट विश्वामध्ये कोहलीने मिळवला आहे.