विशाखापट्टणम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या 10000 धावा पूर्ण करण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र, तत्पूर्वी विराटने घरच्या मैदानावर एका विक्रमाची नोंद केली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराटने घरच्या मैदानावर 4000 धावा करण्याचा विक्रम नावावर केला आहे. त्याने 78 डावांमध्ये हा पल्ला पार केला. या विक्रमात तेंडुलकर 6976 धावांसह आघाडीवर आहे. तेंडुलकरने 160 डावांमध्ये 48.11 च्या सरासरीने हा पल्ला गाठला. त्यात 20 शतकं आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी 4216 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 107 डावांमध्ये 55.47 च्या सरासरीने 7 शतकं आणि 24 अर्धशतकांसह ही पल्ला पार केला.