भारताचा वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून विजय
विराट कोहलीला चार धावांवर जीवदान
रोहित आणि कोहली यांची चौकाराने सुरुवात
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी आपले धावांचे खाते चौकारांनी उघडले.
भारताला पहिला धक्का; शिखर धवन आऊट
- त्रिवेंद्रम : पाचव्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय वेस्ट इंडिज संघाने घेतला खरा, परंतु तो त्यांच्या अंगलट आला. त्यांच्या एकाही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 104 धावांत माघारी परतला.
- विंडीजचे शंभरीत 8 फलंदाज माघारी
- विंडीजला सहावा धक्का
- खलील अहमदने विंडीजला पाचवा धक्का दिला.
- सिमरोन हेटमेयरला पायचीत करताना जडेजाने विंडीजच्या अडचणी वाढवल्या
- कर्णधार विराट कोहलीने दहाव्या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाला पाचारण करत एक चाल खेळली. 12 व्या षटकात त्याला यश मिळाले. भारतासाठी धोकादायक वाटणाऱ्या मार्लोन सॅम्युअल्सला जडेजाने बाद केले.
-जस्प्रीत बुमराने दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विंडीजला दुसरा धक्का दिला.
त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा वन डे सामना आज त्रिवेंद्रम येथे सुरू आहे. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर विंडीजचा सलामीवीर कायरेन पॉवेलला झेलबाद करत माघारी पाठवले.
माजी कसोटीपटू राहुल द्रविडचा सामन्यापूर्वी स्मृतीचिन्ह देऊन आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी द्रविडचा सत्कार केला.
कर्णधार विराट कोहलीच्या संघाने मुंबईत झालेल्या चौथ्या सामन्यात विंडीजवर 224 धावांनी विजय मिळवून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू अॅशले नर्स दुखापतीमुळे बाहेर.