Join us  

IND vs ZIM 1st ODI Live : Deepak Chahar चा कहर! ६ धावा अन् २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना पाठवले माघारी

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारताचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 2:09 PM

Open in App

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारताचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लोकेशने बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन केले, तर दीपक चहरही ( Deepak Chahar) जवळपास ६ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय. त्याने त्याच्या स्विंग गोलंदाजीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना हैराण करून सोडले. सुरुवातीच्या सहा षटकांत धावगतीवर चाप बसवल्यानंतर चहरने धक्के देण्यास सुरुवात केले. २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना माघारी पाठवून भारताला चांगली सुरुवात करून दिली. 

भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.  

इनोसेंट काइया ( ४) व तदीवानासे मरुमानी (८) यांनी सावध खेळ करताना खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अनुक्रमे २० व २२ चेंडू खेळून काढताना २५ धावांची भागीदारी केली. पण, चहरने ७व्या षटकात झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. इनोसेंट ४ धावांवर यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ६.४ षटकांत भारताला पहिली विकेट मिळाली आणि त्यानंतर पुढील २० चेंडूंत आणखी ३ फलंदाज माघारी परतले. चहरने ९व्या षटकात मरुमानीला झेलबाद केले. त्यापाठोपाठ मोहम्मद सिराजने सीन विलियम्सनची ( १) महत्त्वाची विकेट मिळवून दिली. स्लिपमध्ये शिखर धवनने हा झेल टिपला. चहरने चौथी विकेट मिळवून देताना वेस्ली माधेव्हेरेला ( ५) LBW केले. बिनबाद २५ वरून ४ बाद ३१ अशी अवस्था झिम्बाब्वेची झाली. 

फॉर्मात असलेल्या सिकंदर रजा व कर्णधार रेगिस चकाब्वा यांनी डाव सावरताना संघाला १४ षटकांत ५२ धावांपर्यंत पोहोचवले आहे. भारताने १२.५ षटकांत दोन्ही DRS गमावले आहेत.  

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेदीपक चहरमोहम्मद सिराज
Open in App