India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार लोकेश राहुलने यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी बोलावले आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करतोय. फेब्रुवारी २०२२ प्रथमच मैदानावर उतरलेल्या दीपक चहरने ( Deepak Chahar) पुनरागमनाच्या सामन्यात झिम्बाब्वेला दोन धक्केही दिले आहेत. पण, या सामन्यात कर्णधार राहुलच्या एका कृतीची चर्चा फार रंगली आहे. भारताचं राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी लोकेश राहुलने असं काही केलं, की त्याच्या देशभक्तीचे कौतुक होऊ लागले.
भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.
इशान किशन, संजू सॅमसन यांचेही पुनरागमन चाहत्यांना सुखावणारे आहे. ऋतुराज गायकवाडला अजूनही बाकावर बसवून ठेवण्यात आले आहे. दीपक चहरही आयपीएल २०२२पूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता आणि इतक्या महिन्यांनी तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. शुबमन गिल व शिखर धवन ही जोडी सलामीला येणार असल्याचे दिसतेय. या सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या SONY नेही गिल व धवन ही जोडी ओपनिंगला येईल असे दाखवले आहे. लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.
लोकेश राहुलने असं काय केलं?