IND vs ZIM 1st ODI Live : झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

India vs Zimbabwe 1st ODI Live : सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या Deepak Chahar  ने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. पण, ९व्या विकेटने भारताला सडेतोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:00 PM2022-08-18T16:00:00+5:302022-08-18T16:00:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ZIM 1st ODI Live : Richard Ngarava and Brad Evans have added 70 runs for the ninth wicket, India need 190 runs to defeat Zimbabwe  | IND vs ZIM 1st ODI Live : झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

IND vs ZIM 1st ODI Live : झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Zimbabwe 1st ODI Live : सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या Deepak Chahar  ने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल व मोहम्मद सिराज यांनी धक्कातंत्र कायम राखताना यजमानांना हतबल केले. पण, रिचर्ड एनगाराव्हा व ब्रॅड इव्हान्स यांनी ९व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. 

भारताचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.  इनोसेंट काइया ( ४) व तदीवानासे मरुमानी (८) यांनी सावध खेळ करताना खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अनुक्रमे २० व २२ चेंडू खेळून काढताना २५ धावांची भागीदारी केली. पण, चहरने ७व्या षटकात झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. इनोसेंट ४ धावांवर यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ६.४ षटकांत भारताला पहिली विकेट मिळाली आणि त्यानंतर पुढील २० चेंडूंत आणखी ३ फलंदाज माघारी परतले. चहरने ९व्या षटकात मरुमानीला झेलबाद केले. त्यापाठोपाठ मोहम्मद सिराजने सीन विलियम्सनची ( १) महत्त्वाची विकेट मिळवून दिली. स्लिपमध्ये शिखर धवनने हा झेल टिपला. चहरने चौथी विकेट मिळवून देताना वेस्ली माधेव्हेरेला ( ५) LBW केले.  


फॉर्मात असलेल्या सिकंदर रजा व कर्णधार रेगिस चकाब्वा यांनी डाव सावरताना संघाला १४ षटकांत ५२ धावांपर्यंत पोहोचवले आहे. भारताने १२.५ षटकांत दोन्ही DRS गमावले आहेत. लोकेशने गोलंदाजीत बदल करताना फिरकीपटू कुलदीप यादव व जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांना आणले. रजा व चकाब्वा ही सेट होऊ पाहत असलेली जोडी कृष्णाने तोडली. रजा १२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर रायन बर्लही ( ११ ) कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने झिम्बाब्वेची अवस्था ६ बाद ८३ अशी झाली होती. अक्षर पटेलने महत्त्वाची विकेट घेताना चकाब्वेला ३५ धावांवर बाद केले. अक्षरने आणखी एक धक्का देताना ल्युक जाँग्वेला ( १३) LBW केले. 


रिचर्ड एनगाराव्हा व ब्रॅड इव्हान्स या जोडीने ९व्या विकेटसाठी ४९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून झिम्बाब्वेचा डाव सावरला. भारताविरुद्धची झिम्बाब्वेच्या ९व्या विकेटही केलेली ही वन डेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी १९९८मध्ये पी स्ट्रँग व ए व्हायटल यांनी ५३ धावांची भागीदारी केली होती. ७० धावांची ही भागीदारी कृष्णाने तोडली. त्याने एनगाराव्हाला त्रिफळाचीत केले. झिम्बाब्वेच्या फलंदाजाने ४२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत १८९ धावांत माघारी परतला. चहर, कृष्णा व पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. 

Web Title: IND vs ZIM 1st ODI Live : Richard Ngarava and Brad Evans have added 70 runs for the ninth wicket, India need 190 runs to defeat Zimbabwe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.