IND vs ZIM Live Match Updates । हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. वरिष्ठ खेळाडू विश्वचषक खेळून नुकतेच मायदेशात परतल्याने त्यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. पण, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील लाईव्ह सामना कुठे पाहायचा हा अनेकांना प्रश्न पडला आहे. नेहमीप्रमाणे हॉटस्टार किंवा जियो सिनेमावर या सामन्याचे प्रक्षेपण पाहता येणार नाही. झिम्बाब्बेविरूद्धच्या पहिल्या सामन्यातून रियान परागने भारतीय संघात पदार्पण केले. त्याच्यासह ध्रुव जुरेल आणि अभिषेक शर्मा यांना आपल्या राष्ट्रीय संघाचे तिकीट मिळाले. रियान परागला त्याच्या वडिलांनी पदार्पणाची कॅप सोपवली. हा भावनिक क्षण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधत आहे.
दरम्यान, भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजल्यापासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यांना सुरुवात होते. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जातील. पहिल्या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. याशिवाय SonyLIV या ॲपवर देखील सामना पाहता येईल.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जात आहेत. पहिल्या सामन्यातून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया नव्या इनिंगसाठी सज्ज आहे. पाहुण्या टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची युवा ब्रिगेड मैदानात आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा (पदार्पण), ऋतुराज गायकवाड, रियान पराग (पदार्पण), रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (पदार्पण), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.