Join us  

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका, पण १६२ धावांसाठी गमावल्या ५ विकेट्स 

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 6:23 PM

Open in App

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले. भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली. शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) मिळालेल्या संधीचं सोनं करताना ३ विकेट्स घेतल्या. आशिया चषक स्पर्धेची तयारीसाठी सलामीला आलेला कर्णधार KL Rahul १ धावा करून माघारी परतला. शिखर धवन, शुबमन गिल, संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी चांगली फलंदाजी करून संघाचा विजय पक्का केला. 

Deepak Chahar ६ महिन्यानंतर परतला, ३ विकेट्स घेतल्या अन् दुसऱ्याच सामन्यात बाकावर बसला; पण का?

सीन विलियम्स ( ४२) व रायन बर्ल ( ४१*) यांनी झिम्बाब्वेकडून संघर्ष केला, परंतु त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही.  कैटानो व इनोसेंट काइया ही जोडी सलामीला आली आणि त्यांनी ८.४ षटकांत २० धावा केल्या. मोहम्मद सिराजने पहिला धक्का देताना कैटानोला ( ७) बाद केले. संजूने यष्टिंमागे सुरेख झेल घेतला. त्यानंतर शार्दूलने १२व्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने चौथा धक्का दिला. सिकंदर रजा व सीन विलियम्स या जोडीने ५० चेंडूंत ४१ धावा जोडल्या. विलियम्सन ४२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला.  रायन बर्ल ४१ धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी परतला. शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. 

आयपीएल २०२२नंतर लोकेश एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. चार महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता आणि जूनमध्ये जर्मनीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जुलैपासून त्याने सरावाला सुरुवात केली आणि त्याची संघात निवडही झाली होती. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याची गाडी चुकली. पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून त्याने पुनरागमन केले. पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी न मिळाल्याने लोकेश आज ओपनिंगला आला, परंतु ५ चेंडूत १ धाव करून तो व्हिक्टर एनयाऊचीच्या चेंडूवर LBW झाला. भारताला ५ धावांवर पहिला धक्का बसला. धवन व शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी करताना संघाला ट्रॅकवर आणले. धवन ३३ धावांवर बाद झाला.  

इशान किशनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तोही बऱ्याच दिवसांनी मैदानावर उतरला होता. पण, तो ६ धावांवर बाद झाला. गिलसह त्याने ३४ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी ५६ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हुडा २५ धावांवर बाद झाला. संजूने षटकार खेचून भारताचा ५ विकेट्स राखून विजय पक्का केला. त्याने ३९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. 

 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेसंजू सॅमसनलोकेश राहुल
Open in App