Join us  

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी म्हणून ओपनिंगला आला अन् १ धाव करून माघारी परतला, Video

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 4:41 PM

Open in App

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी पाठवला. पहिल्या वन डेत झिम्बाब्वेने १८९ धावा केल्या होत्या आणि शिखर धवन व शुबमन गिल या दोघांनीच हे लक्ष्य पार केले होते. पण, आजच्या सामन्यात गिलला माघारी ठेऊन कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) ओपनिंगला आला. आशिया चषक ( Asia Cup 2022) स्पर्धेपूर्वी बॅटिंग प्रॅक्टिस व्हावी यासाठी लोकेशने आज ओपनिंगला येण्याचा निर्णय घेतला, परंतु १ धाव करून तो माघारी परतला. 

दीपक चहरच्या जागी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आलेल्या शार्दूल ठाकूरने तीन विकेट घेतल्या. सीन विलियम्स ( ४२) व रायन बर्ल ( ४१*) यांनी झिम्बाब्वेकडून संघर्ष केला, परंतु त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही.  कैटानो व इनोसेंट काइया ही जोडी सलामीला आली आणि त्यांनी ८.४ षटकांत २० धावा केल्या. मोहम्मद सिराजने पहिला धक्का देताना कैटानोला ( ७) बाद केले. संजूने यष्टिंमागे सुरेख झेल घेतला. त्यानंतर शार्दूलने १२व्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने चौथा धक्का दिला. सिकंदर रजा व सीन विलियम्स या जोडीने ५० चेंडूंत ४१ धावा जोडल्या. विलियम्सन ४२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला.  रायन बर्ल ४१ धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी परतला. 

आयपीएल २०२२नंतर लोकेश एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. चार महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता आणि जूनमध्ये जर्मनीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जुलैपासून त्याने सरावाला सुरुवात केली आणि त्याची संघात निवडही झाली होती. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याची गाडी चुकली. पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून त्याने पुनरागमन केले. पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी न मिळाल्याने लोकेश आज ओपनिंगला आला, परंतु ५ चेंडूत १ धाव करून तो व्हिक्टर एनयाऊचीच्या चेंडूवर LBW झाला. भारताला ५ धावांवर पहिला धक्का बसला. 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेलोकेश राहुलबीसीसीआयएशिया कप
Open in App