IND vs ZIM 2nd ODI Live Updates : भारताचा मॅच विनिंग खेळाडू संघाबाहेर, लोकेश राहुलने नाणेफेक जिंकली; Playing XI मध्ये बदल

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : वन डे मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:28 PM2022-08-20T12:28:19+5:302022-08-20T12:31:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul wins the toss and India will bowl first, Deepak Chahar goes out, Shardul Thakur back in the playing XI today  | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : भारताचा मॅच विनिंग खेळाडू संघाबाहेर, लोकेश राहुलने नाणेफेक जिंकली; Playing XI मध्ये बदल

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : भारताचा मॅच विनिंग खेळाडू संघाबाहेर, लोकेश राहुलने नाणेफेक जिंकली; Playing XI मध्ये बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : वन डे मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन व शुबमन गिल या दोघांनीच १९० धावांचे लक्ष्य पार करून भारताला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला होता. झिम्बाब्वेविरुद्धचा हा भारताचा सलग १३ वा वन डे सामन्यातील विजय ठरला. आता दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून कर्णधार लोकेश राहुलने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, परंतु मॅच विनर गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याला आज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले आहे.

दीपक चहर पहिल्या वन डे सामन्यातील सामनावीर होता, सहा महिन्यांनंतर मैदानावर परतलेल्या चहरने तीन विकेट्स घेत झिम्बाब्वेला सुरुवातीलाच धक्के दिले होते आणि त्यानंतर अन्य गोलंदाजांनी कमाल केली. नाणेफेक झाल्यानंतर लोकेश राहुल म्हणाला, 'खेळपट्टी मागच्या सामन्यातील तुलनेत अधिक टणक दिसतेय... मागील सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली होती आणि आजही तशीच अपेक्षा आहे. दीपक चहर आजच्या सामन्यात खेळणार नाही, त्याच्याजागी शार्दूल ठाकूरचा समावेश केला गेला आहे.'
लोकेशने मात्र दीपकच्या न खेळण्यामागचं कारण सांगितलं नाही.  

भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर,  कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. प्रसिद्ध कृष्णा ( KL Rahul (c), Shikhar Dhawan, Shubman Gill, Ishan Kishan, Sanju Samson (wk), Deepak Hooda, Axar Patel, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Prasidh Krishna )  

Web Title: IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul wins the toss and India will bowl first, Deepak Chahar goes out, Shardul Thakur back in the playing XI today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.