India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाबे-भारत यांच्यातला दुसरा सामना हरारे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचे या दौऱ्यावर येणे हे झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे आणि त्यांच्या एका दौऱ्याने झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. एरवी झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेला आर्थिक मदतीसाठी ICC, BCCI यांच्यावरच अवलंबून रहावे लागते. आर्थिक परिस्थिती बेताची नसली तरी झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेने सामाजिक भान जपले आहे. त्यांच्या देशातील कॅन्सरग्रस्त मुलांना त्यांनी आजचा सामना समर्पित केला आहे आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीशी आर्थिक मदतही त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होतंय..
पहिल्या सामन्यात शिखर धवन व शुबमन गिल या दोघांनीच १९० धावांचे लक्ष्य पार करून भारताला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला होता. झिम्बाब्वेविरुद्धचा हा भारताचा सलग १३ वा वन डे सामन्यातील विजय ठरला. आता दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून कर्णधार लोकेश राहुलने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, परंतु मॅच विनर गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याला आज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले आहे. दीपक चहर पहिल्या वन डे सामन्यातील सामनावीर होता, सहा महिन्यांनंतर मैदानावर परतलेल्या चहरने तीन विकेट्स घेत झिम्बाब्वेला सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्याच्याजागी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूरची एन्ट्री झाली आहे. लोकेशने मात्र दीपकच्या न खेळण्यामागचं कारण सांगितलं नाही.
भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. प्रसिद्ध कृष्णा ( KL Rahul (c), Shikhar Dhawan, Shubman Gill, Ishan Kishan, Sanju Samson (wk), Deepak Hooda, Axar Patel, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Prasidh Krishna )
झिम्बाब्वेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. तकुडवानाशे कैटानो व तनाका चिवांगा यांना संघात स्थान देऊन तदीवानाशे मरुमानी व रिचर्ड एनगाराव्हा यांना बाकावर बसवले आहे.
Web Title: IND vs ZIM 2nd ODI Live Updates : Zimbabwe cricket board dedicated the second ODI against India to the kids who are affected by cancer in the country
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.