Join us  

IND vs ZIM 3rd ODI Live : KL Rahul ने चूक सुधारली; दोन बदलांसह तिसऱ्या वन डेत टीम मैदानावर उतरवली

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या मालिकेती औपचारिक सामना आज खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:45 PM

Open in App

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या मालिकेती औपचारिक सामना आज खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यांत भारताने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग केला होता. पहिल्या सामन्यात १९० धावांचे लक्ष्य भारताने १० विकेट्स राखून पार केले, परंतु दुसऱ्या सामन्यात १६२ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी ५ विकेट्स गमावल्या. आता फलंदाजांना सराव मिळावा यासाठी लोकेशने प्रथम फलंदाजी स्वीकारली. लोकेशने मागील सामन्यातील चूक सुधारताना आज प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले.  भारताच्या पहिल्या वन डेतील विजयात दीपक चहर ( Deepak Chahar) नायक ठरला होता. त्याने तीन विकेट्स घेताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच धक्के दिले होते. पण, दुसऱ्या सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आले. लोकेशच्या या निर्णयावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. ६ महिन्यानंतर मैदानावर परतलेल्या दीपकला एकाच सामन्यानंतर विश्रांती दिल्याने पुन्हा दुखापतीची चिंता वाटली. पण, त्याला विश्रांती दिल्याचे BCCI ने स्पष्ट केले. त्याच्या जागी संघात आलेल्या शार्दूल ठाकूरने दुसऱ्या वन डेत तीन विकेट्स घेतल्याआजच्या सामन्यात लोकेशने दोन बदल केले आहे. दीपक चहरचे पुनरागमन झाले आहे,  तर आवेश खानला आज संधी दिली गेली आहे. मोहम्महद सिराज व प्रसिद्ध कृष्णा आज विश्रांतीवर आहेत.

भारतीय संघ - शिखर धवन, लोकेश राहुल, शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान ( India XI: Shikhar Dhawan, KL Rahul(C), Shubman Gill, Ishan Kishan, Deepak Hooda, Sanju Samson(W), Axar Patel, Shardul Thakur, Deepak Chahar, Kuldeep Yadav, Avesh Khan)  

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेलोकेश राहुलदीपक चहरआवेश खान
Open in App