India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : लोकेश राहुलला सलामीला येऊनही मोठी खेळी करता आली नाही. शिखर धवनने फॉर्म कायम राखताना दमदार खेळ केला, परंतु शुबमन गिल ( Shubman Gill) व इशान किशन यांची १४० धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. इशान दुसरे अर्धशतक झळकावून रनआऊट झाला, परंतु गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. ८२ चेंडूंत १२ चौकारांसह त्याने ही शतकी खेळी साकारली अन् पेव्हेलियनमध्ये भारतीय खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट केला. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी वन डेतील त्यांचे पहिले शतक हरारे येथेच झळकावले होते.
भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या मालिकेती औपचारिक सामना आज खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यांत भारताने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग केला होता. फलंदाजांना सराव मिळावा यासाठी लोकेशने आज प्रथम फलंदाजी स्वीकारली. लोकेशने मागील सामन्यातील चूक सुधारताना आज प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. आजच्या सामन्यात लोकेशने दोन बदल केले आहे. दीपक चहरचे पुनरागमन झाले आहे, तर आवेश खानला आज संधी दिली गेली आहे. मोहम्महद सिराज व प्रसिद्ध कृष्णा आज विश्रांतीवर आहेत.
लोकेश राहुल व शिखर धवन यांनी सावध सुरुवात करताना अर्धशतकी धावा फलकावर चढवल्या. १७ धावांवर असताना धवनचचा झेल सुटला. १५व्या षटकात ही भागीदारी तुटली. ब्रॅड इव्हान्सने कर्णधार लोकेश राहुलचा ( ३० धावा) त्रिफळा उडवला अन् भारताला ६३ धावांवर पहिला धक्का बसला. सुसाट फॉर्मात असलेला शिखर आज मोठी खेळू शकला नाही. ६८ चेंडूंत ४० धावांवर त्याला इव्हान्सनेच माघारी पाठवले. धवनने या मालिकेत ७७च्या सरासरीने १५४ धावा केल्या आहेत. मिळालेल्या संधीचं सोनं करणाऱ्या शुबमन गिलने आणखी एक अर्धशतकी खेळी साकारताना इशान किशनसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
इशाननेही ६१ चेंडूंत वन डेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर शुबमनला ९८ धावांवर नाबाद असूनही पावसामुळे शतक पूर्ण करता आले नव्हते, परंतु आज त्याने ती सल भरून काढली. ९७ धावांवर असताना शुबमनसाठी LBW ची जोरदार अपील झाली, परंतु DRSमध्ये बॅट व बॉलचा संपर्क आल्याचे दिसले अन् शुबमन वाचला. पण, याच अपील दरम्यान धाव घेण्याच्या प्रयत्नात इशान ५० धावांवर रन आऊट झाला. शुबमन व इशान यांनी १२७ चेंडूंत १४० धावांची भागीदारी केली. दीपक हुडा ( १) इव्हान्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.