IND vs ZIM:रिप्ले पाहूनही थर्ड अंपायरने दिला वादग्रस्त निर्णय; कुलदीप यादवचा विश्वास बसेना! 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 05:45 PM2022-08-18T17:45:46+5:302022-08-18T17:46:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ZIM Controversial decision given by third umpire despite watching replay during Kuldeep Yadav's spell  | IND vs ZIM:रिप्ले पाहूनही थर्ड अंपायरने दिला वादग्रस्त निर्णय; कुलदीप यादवचा विश्वास बसेना! 

IND vs ZIM:रिप्ले पाहूनही थर्ड अंपायरने दिला वादग्रस्त निर्णय; कुलदीप यादवचा विश्वास बसेना! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हरारे : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना हरारेच्या मैदानावर खेळवला जात आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून (India Won The Toss) यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असलेल्या दीपक चाहरने शानदार पुनरागमन करून प्रतिस्पर्धी संघाला एकापाठोपाठ एक मोठे झटके दिले. 

कुलदीपने घेतलेल्या बळीवरून संभ्रम
भारतीय संघाकडून २० वे षटक कुलदीप यादव (Kuldeep Yadav) टाकत होता. षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर रेजिस चकाब्वाविरूद्ध एलबीडब्ल्यूची जोरदार अपील करण्यात आली. मैदानातील अंपायरने त्याला बाद घोषित केले. तो देखील पूर्णपणे बाद असल्याचे दिसत होते पण तोपर्यंत झिम्बाब्वेचे चार आघाडीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यामुळेच कर्णधार चकाब्वाने रिव्ह्यू घेण्याचे ठरवले. मात्र थर्ड अंपायरने दिलेल्या निर्णयावरून संभ्रम निर्माण झाला आहे. 

थर्ड अंपायरने दिला वादग्रस्त निर्णय 
रिप्लेमध्ये चेंडू आणि बॅटमधील अंतर स्पष्टपणे दिसत होते. मात्र त्यानंतर वाद सुरू झाला. चेंडू बॅटमधून गेल्यावर स्निकोमीटरवर कोणतीही हालचाल होत नव्हती, परंतु जेव्हा चेंडू बॅटमधून गेला तेव्हा त्याला एक स्पाइक होते. त्यावेळी चेंडू बॅटला कुठेही स्पर्श करत नव्हता. यानंतरही थर्ड अंपायरने चेंडू बॅटला आदळला असल्याचे सांगितले आणि फलंदाजाला नॉट आऊट घोषित केले.  त्यामुळे मैदानावरील अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. या निर्णयावर कुलदीप यादवसह कोणत्याच भारतीय खेळाडूचा विश्वास बसत नव्हता.

भारतासमोर १९० धावांचे लक्ष्य 
मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल व मोहम्मद सिराज यांनी धक्कातंत्र कायम राखताना यजमानांना हतबल केले. पण, रिचर्ड एनगाराव्हा व ब्रॅड इव्हान्स यांनी ९व्या बळीसाठी विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचे फलंदाज चितपट होत होते. अखेर झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत अवघ्या १८९ धावांवर माघारी परतला. 


 

Web Title: IND vs ZIM Controversial decision given by third umpire despite watching replay during Kuldeep Yadav's spell 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.