IND vs ZIM:आजच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली; हा घातक खेळाडू पदार्पणासाठी सज्ज 

आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:36 AM2022-08-18T10:36:40+5:302022-08-18T10:36:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ZIM India's Playing XI for today's match has been decided, Dhawan and Rahul will be the openers  | IND vs ZIM:आजच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली; हा घातक खेळाडू पदार्पणासाठी सज्ज 

IND vs ZIM:आजच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली; हा घातक खेळाडू पदार्पणासाठी सज्ज 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. के.एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) कशी असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 

राहुल आणि धवन असणार सलामीवीर
२७ ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी राहुलसाठी झिम्बाब्वे दौरा रंगीत तालीम ठरेल. आशिया चषकामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मासोबत राहुल सलामीला खेळणार असल्याने त्यादृष्टीने राहुलला झिम्बाब्वे दौऱ्यात सलामीला खेळविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. आजच्या सामन्यात उपकर्णधार शिखर धवन आणि कर्णधार लोकेश राहुल हे सलामीवीर म्हणून दिसू शकतात. 

भारतीय संघाच्या मधल्या फळीची धुरा युवा खेळाडूंच्या खाद्यांवर असणार आहे. वेस्टविंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शुबमन गिलने सलामीवीर म्हणून शानदार फलंदाजी करत ६४, ४३ व नाबाद ९८ धावांची खेळी केली होती. या जोरावर तो मालिकावीर देखील ठरला होता. त्यामुळे कर्णधार राहुल त्याच्या खांद्यावर मधल्या फळीतील फलंदाजीची धुरा सोपवू शकतो.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संभावित भारतीय संघ -
के.एल.राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाटी, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहमम्द सिराज, कुलदीप यादव. 

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - 
के.एल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाटी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर. 


 

Web Title: IND vs ZIM India's Playing XI for today's match has been decided, Dhawan and Rahul will be the openers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.