Join us  

IND vs ZIM ODI : सलग ८व्या मालिकेतून Washington Sundarची माघार; BCCI ने भारतीय संघात केला बदल

IND vs ZIM ODI : अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar Injury) याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 1:16 PM

Open in App

IND vs ZIM ODI : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar Injury) याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. इंग्लंडमध्ये Royal London Cup स्पर्धेत खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला आठव्या मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे BCCI झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात बदल केला आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी इंग्लंडमध्ये कौंटी अजिंक्यपद व Royal London Cup  स्पर्धा खेळण्यासाठी पाठवले होते. पण, नशीबाने त्याची थट्टा मांडली अन् १२ महिन्यांत चौथ्यांदा त्याला दुखापत झाली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मुकावे लागले होते.  

- हाताला झालेल्या दुखापतीमुळे २०२१मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार- आयपीएल २०२१चं निम्मे सत्र हाताच्याच दुखापतीमुळे खेळू शकला नाही- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही याच दुखापतीमुळे त्याचा विचार केला गेला नाही- डिसेंबर २०२१मध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला- मांडीचे स्नायू ताणल्यामुळे घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून माघार-  याच दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकला- आयपीएल २०२२चे पाच सामने हाताच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही- खांद्याच्या दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार

वॉशिंग्टनच्या जागी शाहबाज अहमदला संधी  - भारतीय संघाच्या निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिरकीपटू शाहबाज अहमद याची निवड केली आहे.  १८, २० व २२ असे तीन वन डे सामने हरारे येथे होणार आहेत.  

भारतीय संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शिखर धवन ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद ( India’s squad for 3 ODIs: KL Rahul (Captain), Shikhar Dhawan (vice-captain), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Rahul Tripathi, Ishan Kishan (wicket-keeper), Sanju Samson (wicket-keeper), Shardul Thakur, Kuldeep Yadav, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Deepak Chahar, Shahbaz Ahmed.)   

टॅग्स :भारतझिम्बाब्वेवॉशिंग्टन सुंदर
Open in App