T20 World Cup 2024 स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा केली. सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill Captain) याच्या खांद्यावर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान दिले गेले नव्हते. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती दिली आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा संघ निवडला गेला आहे. रियान पराग, अभिषेक शर्मा, नितिश कुमार रेड्डी व तुषार देशपांडे यांना झिम्बाब्वे दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळाली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये निवड झालेल्या पण बाकावर बसून राहिलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, आवेश खान व शुबमन हे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहेत.
पण, BCCI ने या संघात एक बदल केला आहे. निवड समितीने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जखमी नितीश रेड्डीच्या जागी भारतीय संघात शिवम दुबेची निवड केली आहे. BCCIचे वैद्यकीय पथक नितीश रेड्डी यांच्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. भारत ६ जुलै पासून हरारे येथे पाच सामन्यांच्या T20I मालिकेत झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे.