IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज

आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:13 PM2024-07-06T16:13:06+5:302024-07-06T16:13:24+5:30

whatsapp join usJoin us
ind vs zim t20 live India won the toss and Elected to Field Abhishek Sharma, Riyan Parag and Dhruv Jurel to make debut for India in the first T20I against Zimbabwe at Harare | IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज

IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ZIM 1st T20 Live | हरारे : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. पाहुण्या टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची युवा ब्रिगेड मैदानात आहे. आजच्या सामन्यातून तीन भारतीय खेळाडूंनी आपल्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले आहे. 

अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग या त्रिकुटाने आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले आहे. आयपीएलमध्ये चकमदार कामगिरी केल्याने त्यांना टीम इंडियाचे तिकीट मिळाले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा (पदार्पण), ऋतुराज गायकवाड, रियान पराग (पदार्पण), रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (पदार्पण), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद. 

झिम्बाब्वेचा संघ - 
सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा. 

दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वीही काही छोटेखानी स्पर्धांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा प्रवास २९ जून रोजी संपला. 

Web Title: ind vs zim t20 live India won the toss and Elected to Field Abhishek Sharma, Riyan Parag and Dhruv Jurel to make debut for India in the first T20I against Zimbabwe at Harare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.