Join us  

IND vs ZIM:भारतीय संघ मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना; शिखर धवनने विमानतळावरच काढली झोप 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:03 AM

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. आगामी मालिकेसाठी भारतीय संघ शनिवारी मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. बीसीसीआयने ट्विटरवर प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चाहर यांसह अन्य काही खेळाडूंचे फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका झिम्बाब्वेच्या धरतीवर खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला तर अनुक्रमे २० आणि २२ ऑगस्ट रोजी शेवटचे दोन सामने पार पडतील. के.एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात आणखी एका मालिकेवर कब्जा करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

 

धवनने विमानतळावरच काढली झोप

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी संघाचा उपकर्णधार शिखर धवनने फेसबुक स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो विमानतळावर झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. धवनच्या या फोटोची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून फोटो खूप व्हायरल होत आहे. बीसीसीआयने ३१ जुलै रोजी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. या मालिकेसाठी शिखर धवनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी के.एल राहुल फिट असल्याचे समोर आले आणि कर्णधारपदी त्याची वर्णी लागली. त्यामुळे धवनच्या खांद्यावर आता उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

झिम्बाब्वेविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -के.एल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयलोकेश राहुलशिखर धवनभारतझिम्बाब्वे
Open in App