Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका

भारतीय संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने खणखणीत चौकार मारत संपवली मॅच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 09:07 PM2024-10-29T21:07:15+5:302024-10-29T21:16:35+5:30

whatsapp join usJoin us
IND W vs NZ W 3rd ODI Smriti Mandhana Century Harmanpreet Kaur Fifty India beats New Zealand by 6 wickets also sealed the three-match ODI series 2-1 | Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका

Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India beats New Zealand by 6 wickets also sealed the three-match ODI series 2-1 : भारतीय महिला संघाची उप कर्णधार आणि स्फोटक बॅटर स्मृती मानधानाचा शतकी तोरा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरनं केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाविरुद्धचा निर्णायक सामना जिंकला आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या वनडे सामन्यातील विजयासह भारतीय महिला संघानं ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी आपल्या नावे केली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंड महिला संघाने ४९.५ षटकात सर्वबाद २३२ धावा केल्या होत्या. निर्णायक सामन्यात या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं ६ विकेट्स राखून विजय मिळवला. भारतीय संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने खणखणीत चौकार मारत मॅच संपवली. 

टीम इंडियाकडून दीप्तीनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स

पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघ धावांसाठी संघर्ष करताना दिसला. भारतीय गोलंदाजीसमोर त्यांनी अगदी  सावध पवित्रा घेतच खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय गोलंदाजीसमोर आघाडीच्या बॅटरचा निभाव काही लागला नाही.  न्यूझीलंडकडून ब्रुक हालीडे (Brooke Halliday) हिने ९६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेली ८६ धावांची खेळी आणि जॉर्जिया प्लिमर (Georgia Plimmer) नं ६७ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने केलेल्या ३९ धावा वगळता अन्य बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय प्रिया मिश्रानं २ विकेट्स घेतल्या. रेणुका सिंह आणि सायमाच्या खात्यात प्रत्येकी १-१ विकेट जमा झाली. जेमिमान यश्तिकाच्या साथीनं दोघींना रन आउटच्या रुपात तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय सायमानं एक विकेट रन आउटच्या रुपात घेतल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडचा डाव निर्धारित ५० व्या षटकातील ५ व्या चेंडूवरच २३२ धावांवर आटोपला.

आधी स्मृती मानधनानं यश्तिका भाटियाच्या साथीनं  सावरला डाव

न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. धावफलकावर १६ धावा असताना शेफाली वर्मा १२ धावा करून माघारी फिरली. स्मृती मानधनानं विकेट किपर बॅटर यश्तिकाच्या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. यश्तिका ४९ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३५ धावांचे बहुमुल्य योगदान देऊन बाद झाली.

मग उपकॅप्टन स्मृतीनं कॅप्टन हरमप्रीतसोबत केली शतकी भागीदारी

२ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर ९२ धावा असताना भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात उतरली. उप कर्णधार स्मृती मानधनासोबत तिची जोडी जमली आणि न्यूझीलंड महिला संघ बॅकफूटवर गेला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. १२२ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने १०० धावा काढून स्मृती मानधना बाद झाली. तोपर्यंत सामना भारताच्या बाजूनं अगदी सेट झाला होता. 

 स्मृतीची विकेट पडल्यावर जेमिमा रॉड्रिग्जसह हमनप्रीत कौरनं भारतीय संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. संघाला विजयासाठी अवघी एका धावेची गरज असताना जेमिमानं आपली विकेट गमावली. तिने १८ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. दुसऱ्या  बाजूला हरननप्रीत कौर ६३ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ५९ धावांची खेळी करत मॅच संपवली.
 

Web Title: IND W vs NZ W 3rd ODI Smriti Mandhana Century Harmanpreet Kaur Fifty India beats New Zealand by 6 wickets also sealed the three-match ODI series 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.