IND Women vs SA Women : भारतीय महिला संघाने तिसऱ्या व शेवटच्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्स व ५६ चेंडू राखून दणदणीत विजय नोंदवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा स्मृती मानधनाचे ( SMRITI MANDHANA ) वादळ पुन्हा घोंगावले, परंतु तिला ऐतिहासिक शतकापासून थोडक्यासाठी मुकावे लागले. स्मृतीने ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. भारतीय महिला संघाने २१६ धावांचे लक्ष्य ४०.४ षटकांत सहज पार केले.
स्मृती व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही ४८ धावा जोडल्या. मागील दोन सामन्यांत शतक झळकावणारी स्मृती ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावांवर बाद झाली. आज तिने शतक झळकावले असते तर ती वन डे क्रिकेटमध्ये सलग तीन शतकं झळकावणारी पहिली आशियाई खेळाडू बनली असती. पण, तिने एकाच मालिकेत सर्वाधिक ( किमान ३ इनिंग्ज) धावा करण्याचा विक्रम स्मृतीने नावावर केला. तिने या मालिकेत ३४३ धावा केल्या आहेत आणि टॅमि बियूमोंट ( ३४२ वि. पाकिस्तान, २०१६) हिचा विक्रम मोडला.
हरमनप्रीतने ४२ धावांची आणि जेमिमा रॉड्रीग्जने १९ धावांची खेळी करून आज भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.