Video : अनुभवी सौम्या सरकारला भारताचा युवा खेळाडू भिडला; अम्पायर भांडण सोडवायला धावला

INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : भारतीय अ संघाने ACC Men's Emerging Cup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेश अ संघावर ५१ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:49 PM2023-07-21T22:49:07+5:302023-07-21T22:49:32+5:30

whatsapp join usJoin us
INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : The situation is getting heated up between IND A and BAN A, Harshit Rana and Soumya Sarkar fight, Video   | Video : अनुभवी सौम्या सरकारला भारताचा युवा खेळाडू भिडला; अम्पायर भांडण सोडवायला धावला

Video : अनुभवी सौम्या सरकारला भारताचा युवा खेळाडू भिडला; अम्पायर भांडण सोडवायला धावला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : भारतीय अ संघाने ACC Men's Emerging Cup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेश अ संघावर ५१ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल होणार आहे.  जेतेपदाच्या सामन्यात २३ जुलैला भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. कर्णधार यश धुलच्या दमदार फलंदाजीनंतर निशांत सिंधूने ५ विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात बांगलादेशचा अनुभव फलंदाज सौम्या सरकार आणि भारताचा युवा हर्षित राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी सहकाऱ्यांसोबत अम्पायर्सही धावले. 


प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. कर्णधार यश धुल वगळता (६६) कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. साई सुदर्शन ( २१), अभिषेक शर्मा (३४), निकिन जोस (१७), निशांत सिंधू (५), रियान पराग (१२), ध्रुव झरेल (१), हर्षित राणा (९), मानव सुथार (२१), राजवर्धन हंगर्गेकरला (१५) धावा करण्यात यश आले. बांगलादेशकडून मेहदी हसन (२), तनझीम साकिब (२), रकिबुल हसन (२), रिपोन मोंडोल (१) आणि सैफ्य हसन (१), सौम्य सरकारला (१) बळी घेण्यात यश आले.


मोहम्मद नईम ( ३८) आणि तांझिद हसन ( ५१) या सलामीवीरांनी बांगलादेशला सकारात्मक सुरूवात करून दिली. जाकिर हसन ( ५), सौम्या सरकार ( ५), अकबर अली ( २) यांनाही भारतीय गोलंदाजांनी झटपट माघारी पाठवले. कर्णधार सैफ हसनला २२ धावांवर अभिषेक शर्माने बाद करून मोठा धक्का दिला. तांझिद हसन ५१ धावांवर बाद झाल्याने बांगलादेशचा संघ अडचणीत सापडला. त्यात निशांत सिंधूने ३२ व्या षटकात सलग दोन विकेट्स घेताना बांगलादेशची अवस्था ८ बाद १५४ अशी केली आणि भारताचा विजय जवळपास पक्का केला. मानव सुतारने सामन्यातील तिसरी विकेट घेत बांगलादेशचा संपूर्ण संघ ३४.२ षटकांत १६० धावांत तंबूत पाठवला. भारताने ५१ धावांनी हा सामना जिंकला. 



 

Web Title: INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : The situation is getting heated up between IND A and BAN A, Harshit Rana and Soumya Sarkar fight, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.