Independence Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हणाले. भारताला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले गेले. देशभरातील अनेक कलाकारांसह भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनीही या मोहिमेत सहभाग घेतला.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, माजी सलामीवीर गौतम गंभीर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी अष्टपैलू इरफान पठाण व युसूफ पठाण आदींनी या मोहिमेत स्वतः भाग घेऊन इतरांनाही आवाहन केले. सर्व सेलिब्रेटिंनीही त्यांच्या सोशल मीडियावरील DP वर तिरंगा ठेवला. अशात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला सर्वांची खूप पसंती मिळतेय...
बघा काय म्हणतोय रोहित या व्हिडीओत...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. २० ऑगस्टला सर्व खेळाडू यूएईला रवाना होतील. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत २८ ऑगस्टला होणार आहे. रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतही भारतच बाजी मारेल, असा विश्वास आहे.