IND vs BAN : सीनियर्स ढेपाळले पण ज्युनियर्सनी बांगलादेशला आसमान दाखवले; दणदणीत विजयासह जिंकली मालिका

India A vs Bangladesh A : बांगलादेश दौऱ्यावर भारताच्या सीनियर संघाची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:07 PM2022-12-09T17:07:54+5:302022-12-09T17:08:26+5:30

whatsapp join usJoin us
India A bowlers were on a roll on the final day as they skittled out Bangladesh A for 187 to complete a big win by an innings and 123 runs. India A also won the 2-match series 1-0. | IND vs BAN : सीनियर्स ढेपाळले पण ज्युनियर्सनी बांगलादेशला आसमान दाखवले; दणदणीत विजयासह जिंकली मालिका

IND vs BAN : सीनियर्स ढेपाळले पण ज्युनियर्सनी बांगलादेशला आसमान दाखवले; दणदणीत विजयासह जिंकली मालिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India A vs Bangladesh A : बांगलादेश दौऱ्यावर भारताच्या सीनियर संघाची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी झाली आहे. भारताला सलग दोन सामन्यांत बांगालदेशने नमवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीमुळे चौफेर टीका होत असताना बांगलादेशमध्येच भारताचे ज्युनियर खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारत अ संघाने दुसऱ्या सामन्यात एक डाव व १२३ धावांनी विजय मिळवून मालिका १-० अशी खिशात टाकली.

बांगलादेश अ संघाचा पहिला डाव २५२ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. मुकेश कुमारने ४० धावांत ६ विकेट्स घेत बांगलादेशला धक्क्यांवर धक्के दिले. उमेश यादव ( २-५५) व जयंत यादव ( २-५६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने डाव ९ बाद ५६२ धावांवर घोषित केला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने आणखी एक शतकी खेळी केली. त्याने २४८ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५७ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा ( ५२), श्रीकर भरत ( ७७) , जयंत यादव ( ८३) व सौरभ कुमार ( ५५) यांच्या अर्धशतकांनी बांगलादेशसमोर तगडे आव्हान उभे केले.


बांगलादेशचा दुसरा डाव १८७ धावांत गडगडला. सलामीवीर शादमन इस्लामच्या ९३ धावांची खेळी वगळल्यास बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. सौरभ कुमारने ७४ धावांत ६ विकेट्स घेतल्या. उमेश यादव व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

रोहितच्या जागी अभिमन्यूला मिळेल संधी...
बंगालचा फलंदाज आणि सध्याच्या बांगलादेश अ दौऱ्यासाठी भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रांगेत असतील. २७ वर्षीय उजव्या हाताचा सलामीवीर सध्या सुरू असलेल्या ए मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने बॅक टू बॅक शतके ठोकली आहेत. पहिल्या सामन्यात त्याने १४१ धावांची खेळी केली आणि दुसऱ्या सामन्यात तो १५१ धावांवर बाद झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India A bowlers were on a roll on the final day as they skittled out Bangladesh A for 187 to complete a big win by an innings and 123 runs. India A also won the 2-match series 1-0.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.