India A vs New Zealand A, Sanju Samson : भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज आहेत. रिषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळायला हवी होती असं मत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केले. त्यामुळेच भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरूअनंतपूरम येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत सॅमसनचे चाहते त्याच्या नावाचा टी शर्ट घालून स्टेडियमवर BCCI चा निषेध नोंदवण्याच्या तयारीत आहेत. पण, त्यांचा हा विरोध काहीअंशी मावळेल अशी बातमी समोर येतेच... न्यूझीलंड अ संघ भारत दौऱ्यावर आला आहे आणि तीन चार दिवसीय सामन्यातील तिसरा सामना सुरू आहे. त्यानंतर भारत अ व न्यूझीलंड अ यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठी आज संघ जाहीर केला आहे.
भारतीय संघाकडून २०१५ मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. ७ वन डे सामन्यात त्याने ४४ च्या सरासरीने १७६ धावा केल्या आहेत. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे मालिकेत संजू सॅमसन भारत अ संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने ही निवड केली आहे. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड हेही संघात आहेत. इशान किशनला वगळून केएस भरत याची यष्टिरक्षक म्हणून निवड केली गेली आहे.
भारत अ संघ - पृथ्वी शॉ, अभिमन्यू इस्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन ( कर्णधार), केएस भरत ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, शाबाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा ( India A squad: Prithvi Shaw, Abhimanyu Easwaran, Ruturaj Gaikwad, Rahul Tripathi, Rajat Patidar, Sanju Samson (Captain), KS Bharat (wicket-keeper), Kuldeep Yadav, Shabhaz Ahmed, Rahul Chahar, Tilak Varma, Kuldeep Sen, Shardul Thakur, Umran Malik, Navdeep Saini, Raj Angad Bawa)
- २२ सप्टेंबर - पहिला वन डे, चेन्नई
- २५ सप्टेंबर - दुसरा वन डे, चेन्नई
- २७ सप्टेंबर - तिसरा वन डे, चेन्नई