Join us  

कसोटीनंतर विराटसेना आता वन-डेतही अव्वल स्थानावर

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्या भारतीय संघानं वन-डेमध्येही अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 2:59 PM

Open in App

नवी दिल्ली - कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्या भारतीय संघानं वन-डेमध्येही अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे. आयसीसीने आज क्रमवारी प्रसिद्ध केली. यामध्ये भारतीय संघ 120 गुणासह प्रथम क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर ढकलली गेली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या वन-डे मालिकेत भारतानं पहिले दोन सामने एकहाती जिंकले. या दोन्ही विजयाचा फायदा भारताला क्रमवारीत झाला तर दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा फटका बसल्याचे पहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेला एका गुणांचा फटका बसला आहे. इंग्लड (116), न्यूझीलंड (115) आणि ऑस्ट्रेलिया (112) अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. 

सध्या भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर शिखरनं वन-डे मालिकेत आपला जलवा दाखवला आहे. शिखरनं दुसऱ्या वन-डेत अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली होती. दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीची जादू दक्षिण आफ्रिकेतही कायम आहे. पहिल्या वन-डेत दमदार शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या वन-डेतही 46 धावांची संयमी खेळी केली. सध्याचा भारतीय वन-डे संघ संतुलित भासत आहे. दक्षिण आफ्रिकेतील मैदानावर भारतीय गोलंदाजांनी आपली छाप सोडली. आफ्रिकेच्या गोलंदाजापेक्षा भारतीय गोलंदाजी आधिक घातक दिसत आहे. 

 

आयसीसी फलंदाजी क्रमवारीत कोहलीने काबीज केले अव्वलस्थानपहिल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी 33वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावत विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. कोहलीने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलियर्स (872) याला मागे टाकत अग्रस्थान काबिज केले. कोहलीचे आता 876 गुण झाले असून 9000 चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्याला 24 गुणांची आवश्यकता आहे.एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (816) चौथ्या क्रमांकावर असून त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (823) आहे.  रोहितने या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी तो वॉर्नरला मागे टाकू शकतो. कोहली आणि रोहित शिवाय अव्वल दहा फलंदाजांमध्ये अन्य भारतीय नसून डिव्हिलियर्ससह दक्षिण आफ्रिकेचे एकूण चार फलंदाज अव्वल दहामध्ये आहेत. यामध्ये क्विंटन डिकॉक (सहाव्या स्थानी), फाफ डू प्लेसिस (नववा) आणि हाशिम आमला (दहावा) यांचा समावेश आहे. भारताचे महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन अनुक्रमे 13व्या आणि 14व्या स्थानी आहेत.

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८बीसीसीआयविराट कोहली