पाकिस्तान क्रिकेड बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रमीज राजा यांनी वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरू केलेली दिसत आहे. रमीज राजा यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतानं पाकिस्तानची रणनितीचा वापर करुन संघ बांधला आणि त्यानंतरच भारतीय संघ उत्तम झाला, असा दावा रमीज राजा यांनी केला आहे.
रवी शास्त्रींनाच कर्णधारपदी नको होता कोहली; वनडेचीही कॅप्टन्सी सोडायला सांगितली!
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. "भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पाकिस्तानचा संघ नेहमीच आवडीचा संघ राहिला आहे. भारतीय संघानं पाकिस्तानी संघाच्या सर्व चांगल्या आणि उपयुक्त रणनितींचा वापर करुन संघाची बांधणी केली. रवी शास्त्री पाकिस्तानच्या संघाबाबत नेहमीच प्रभावित राहिलेले आहेत. पाकिस्तानचे क्रिकेटपटू भरपूर मेहनती आणि समर्पित भावनेनं खेळणारे आहेत. आम्ही ज्या खेळाडूंमध्ये प्रतिभेची कमतरता जाणवत आहे अशा खेळाडूंची १०० टक्क्यांपर्यंत कामगिरी कशी उंचावेल यासाठी प्रयत्न करत आलो आहोत. हिच रणनिती भारतानंही आजमावली", असं रमीज राजा म्हणाले.
'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'
भारतानं पाकिस्तानच्याच रणनितीनुसार आपल्या साचेबद्ध पद्धतीत बदल केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी खूप सुधारणा केली आणि त्यांच्या सर्व शंकांच आपोआप निरसन होऊ लागलं. पाकिस्तानला आता पुन्हा त्याच पद्धतीनं काम करावं लागणार आहे आणि यासाठी कमीत कमी पुढील ३ ते ४ वर्ष काम करावं लागणार आहे, असंही रमीज राजा म्हणाले.