Join us  

भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध चांगल्या स्थितीत; कुलदीपचे ५ बळी

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे ५ बळी व त्यानंतर सलामीवीर रविकुमार समर्थ व अभिमन्यू ईश्वरन यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारत अ संघ रविवारी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या अनौपचारीक कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 1:26 AM

Open in App

बंगळुरू : फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे ५ बळी व त्यानंतर सलामीवीर रविकुमार समर्थ व अभिमन्यू ईश्वरन यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारत अ संघ रविवारी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या अनौपचारीक कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.समर्थ (८३) व ईश्वरन (८६) यांनी सलामीसाठी केलेल्या १७४ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद २२३ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ३४६ धावांत आटोपला. भारत अ संघ अद्यापही १२३ धावांनी पिछाडीवर आहे.तत्पूर्वी, कुलदीप यादवच्या (५/९१) जोरावर भारतीयांनी आॅसीला मर्यादेत रोखले. शाहबाज नदीमने ९० धावांत ३ बळी घेत चांगली साथ दिली. आॅसी कर्णधार मिशेल मार्श ११२ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात समर्थ व ईश्वरन यांच्या शतकी भागीदारीने भारत अ संघाने मजबूत सुरुवात केली; परंतु दोघेही शतक पूर्ण करू शकले नाही. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने अंकित बावणेसह ४१ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)।संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया अ (पहिला डाव) : १०९ षटकांत सर्वबाद ३४६ धावा. (टीम हेड ६८, शॉन मार्श नाबाद ११३; कुलदीप यादव ५/९१, एस. नदीम ३/९0).भारत अ (पहिला डाव) : ७० षटकांत ३ बाद २२३ धावा. (रवीकुमार समर्थ ८३, अभिमन्यू ईश्वरन ८६, श्रेयस अय्यर खेळत आहे ३०, अंकित बावणे १३. एशटन एगर १/४१).

टॅग्स :कुलदीप यादव