Join us  

टीम इंडिया ऑगस्टमध्ये परदेश दौऱ्यावर जाणार; BCCIनं दिला ग्रीन सिग्नल, पण...

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्या कसोटी मालिकेपाठोपाठ टीम इंडियाही दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 5:43 PM

Open in App

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्या कसोटी मालिकेपाठोपाठ टीम इंडियाही दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची तयारी दर्शवली आहे. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती दोन्ही देशांच्या सरकारच्या मान्यतेची... दी आयलंड या वेससाईटनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

श्रीलंका क्रिकेट मंडळानं या मालिकेसाठी त्यांच्या क्रीडा मंत्रालयाकडे मान्यता मागितली आहे. ही मालिका जून महिन्यात होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती लांबणीवर पडली. श्रीलंका सरकारनं या मालिकेला मान्यता दिल्यानंतर क्रिकेट मंडळ वेळापत्रकावर काम करणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून क्रिकेट मंडळ काही प्रेक्षकांनाही सामना पाहण्याची मंजूरी देण्याच्या तयारीत आहे.  

दरम्यान, श्रीलंकेनं आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनासाठीही तयारी दर्शवली आहे. यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे, पण भारतीय संघाचा तेथे जाण्यास विरोध आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) आशिया चषक आयोजनाचा हट्ट सोडल्याचे वृत्त GeoSuper या वेबसाईटनं दिलं आहे.

पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा आशिया चषक हा श्रीलंके होणार असल्याचा दावा या वेबसाईटनं केला आहे. यंदा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. पण, बीसीसीआयचा त्याला विरोध आहे आणि ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत कोरोना व्हायरसच्या संकटात संयुक्त अरब अमिरातीपेक्षा श्रीलंका हा सुरक्षित पर्याय असल्याचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटनं ठेवला. 

अन्य देशांच्या तुलनेत श्रीलंकेतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. तेथे 2000 हून कमी कोरोना रुग्ण आहेत आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त अरब अमिराती येथे 40000 रुग्ण आहेत आणि मृतांचा आकडा 281 इतका आहे. पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की,''पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यंदाचा आशिया चषक श्रीलंकेत होईल, तर पुढील स्पर्धेसाठी पीसीबी दावा करणार आहे.''

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठीही बीसीसीआय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी चर्चा करत आहे.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत! 

पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!

शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ

चिनी वस्तूंसह हिच्यावरही बहिष्कार घाला; ट्विटमध्ये आपला फोटो पाहून ज्वाला गुट्टा खवळली

अरे देवा: विम्बल्डन विजेता 73 व्या वर्षी चढला बोहोल्यावर; 30 वर्षांनी लहान आहे पाचवी पत्नी!

टॅग्स :बीसीसीआयभारत विरुद्ध श्रीलंका