Join us  

OMG ! हार्दिक पांड्याला तातडीनं NCA मध्ये व्हाव लागलं दाखल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला टेंशन?

Hardik Pandya will be at NCA -२०१८मध्ये दुबईत स्ट्रेचरवरून हार्दिक पांड्याला क्रिकेटचं मैदान सोडावं लागलं होतं... त्यानंतर त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 4:25 PM

Open in App

Hardik Pandya will be at NCA -२०१८मध्ये दुबईत स्ट्रेचरवरून हार्दिक पांड्याला क्रिकेटचं मैदान सोडावं लागलं होतं... त्यानंतर त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली गेली. पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी हार्दिकने रात्रंदिवस मेहनत घेतली आणि कमबॅक केले. परंतु ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये तो फेल गेला, त्याच्यावर टीका झाली. त्याकडेही त्याने सकारात्मकतेनं पाहिलं आणि पुन्हा विश्रांती घेत कसून मेहनत केली. त्यानंतर हार्दिकने आयपीएल २०२२ गाजवले आणि नेतृत्व कौशल्य सिद्ध करताना गुजरात टायटन्सना जेतेपद पटकावून दिले. भारतीय संघातील त्याचे पुनरागमन जोरदार राहिले. त्याच्या गोलंदाजीचा वेग अधिक वाढलाय, त्यात विविधता आलीय, फलंदाजीत तर तो करिष्मा करतोय. अशात भारत-ऑस्ट्रेलिया ( India vs Australia)  मालिका संपताच हार्दिक BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल झाला आहे.

आगामी  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून BCCI ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेचे आयोजन केले. आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ दुसऱ्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. २८ सप्टेंबरपासून India vs South Africa 1st T20I याच्यातल्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ २८ तारखेपासून दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. अर्शदीप सिंग व दीपक हुडा यांचे पुनरागमन होत आहे. मोहम्मद शमीला कोरोना झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकेतून माघार घ्यावी लागली होती आणि आफ्रिकेविरुद्ध तो तंदुरूस्त आहे की नाही, याचे अपडेट्स आलेले नाहीत. दीपक हुडाचीही पाठदुखी बळावल्याचे वृत्त समोर येतेय, त्यामुळे तो या मालिकेला मुकू शकतो. भुवी व हार्दिकला या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे.  दीपक चहरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

हार्दिकने सोशल मीडियावरून NCA साठी बंगळुरू येथे दाखल होत असल्याची पोस्ट केली. हार्दिकच्या या पोस्टने सर्वांची चिंता वाढली आहे. भारतीय संघ पुढील आठवड्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. त्याआधी हार्दिक पांड्याला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळवण्यात आलेले नाही. आफ्रिकेसाठी संघ जाहीर करतानाच BCCI ने या मालिकेत हार्दिक व भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती मिळेल हे स्पष्ट केले होते. त्या काळात ही दोघं NCA मध्ये  'conditioning work'साठी दाखल होणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ताजेतवाने राहाता यावे यासाठी BCCI ने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2
Open in App