भारत पाकिस्तानविरूद्ध नेहमी चांगला खेळतो पण सध्या टीम इंडिया मजबूत नाही - मोहम्मद कैफ

Asia cup 2023, ind vs pak : आशिया चषकात २ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:16 PM2023-08-02T22:16:36+5:302023-08-02T22:17:04+5:30

whatsapp join usJoin us
India always plays well against Pakistan in ICC events but India is not looking the strongest on paper because I think they are missing the key players, says former indian player mohammad kaif  | भारत पाकिस्तानविरूद्ध नेहमी चांगला खेळतो पण सध्या टीम इंडिया मजबूत नाही - मोहम्मद कैफ

भारत पाकिस्तानविरूद्ध नेहमी चांगला खेळतो पण सध्या टीम इंडिया मजबूत नाही - मोहम्मद कैफ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

mohammad kaif on team india  | नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार म्हटलं की, क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगते. केवळ आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांमध्ये हे प्रतिस्पर्धी आमनेसामने येतात. आता पुन्हा एकदा मोठ्या कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान असा सामना पाहायला मिळणार आहे. ३० ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होत असून २ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. या बहुचर्चित सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने परखड मत मांडले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याबद्दल विचारले असता कैफने म्हटले, "भारत आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चांगला खेळतो. टीम इंडियाचा विक्रम देखील चांगला राहिला आहे. पण याक्षणी, कागदावर भारत सर्वात मजबूत दिसत नाही. कारण दुखापतीमुळे भारताचे प्रमुख खेळाडू ग्रस्त आहेत. आपल्याला लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत यांची उणीव भासत आहे. जसप्रीत बुमराह हा सर्वांत मोठा घटक आहे. जर बुमराहचे पुनरागमन झाले नाही तर भारताला सामना जिंकण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल."

३० तारखेपासून रंगणार थरार 
३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. 

आशिया चषकाचे वेळापत्रक
३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल   

Web Title: India always plays well against Pakistan in ICC events but India is not looking the strongest on paper because I think they are missing the key players, says former indian player mohammad kaif 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.