भारत ‘अ’ आणि बोर्ड अध्यक्ष संघांची घोषणा

न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या तीन वन-डे लढतींसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे, तर त्याचप्रमाणे न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामन्यांत बोर्ड अध्यक्ष एकादशचेही नेतृत्व करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:45 AM2017-10-03T02:45:22+5:302017-10-03T02:45:39+5:30

whatsapp join usJoin us
India 'A' and Board President's team announcement | भारत ‘अ’ आणि बोर्ड अध्यक्ष संघांची घोषणा

भारत ‘अ’ आणि बोर्ड अध्यक्ष संघांची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या तीन वन-डे लढतींसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे, तर त्याचप्रमाणे न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामन्यांत बोर्ड अध्यक्ष एकादशचेही नेतृत्व करणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी बीसीसीआयने सोमवारी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली. हा संघ विशाखापट्टणममध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पाच वन-डे सामने खेळणार आहे. याव्यतिरिक्त बोर्ड अध्यक्ष इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ दोन सराव सामने खेळेल. बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘सीनिअर निवड समितीने भारत ‘अ’ आणि बोर्ड अध्यक्ष इलेव्हन संघांची घोषणा केली आहे. भारत ‘अ संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध विशाखापट्टणममध्ये पाच वन-डे सामने खेळणार आहे. बोर्ड अध्यक्ष इलेव्हन मुंबईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामने खेळेल.’
भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ संघांदरम्यान पहिला वन-डे ६ आॅक्टोबरला खेळला जाईल. बोर्ड अध्यक्ष इलेव्हन व न्यूझीलंडदरम्यान पहिला सराव सामना १७ आॅक्टोबरला होईल.

संघ
पहिल्या तीन वन-डेसाठी भारत ‘अ’ संघ : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, शुभमन गिल, श्रीवत्स गोस्वामी, शाहबाज नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी.

अखेरच्या दोन वन-डेसाठी भारत ‘अ’ संघ : ए. आर. ईश्वरन, प्रशांत चोपडा, अंकित बावणे, शुभमान गिल, बाबा अपराजित, रिषभ पंत (कर्णधार), शाहबाज नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी.

बोर्ड अध्यक्ष इलेव्हन :- पृथ्वी शॉ, शिवम चौधरी, श्रेयस अय्यर (कर्णधार), करुण नायर, गुरकिरत मान, मिलिंद कुमार, रिषभ पंत, शाहबाज नदीम, दीपक चहार, धवल कुलकर्णी, जयदेव उनादकट, अवेश खान.

Web Title: India 'A' and Board President's team announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.