Asia Cup 2022, IND vs PAK : भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत दणक्यात सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धुळ चाखवली. १० महिन्यांपूर्वी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या परावाची परतफेड भारताने केली. हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला. १४८ धावांचे लक्ष्य भारताने ५ विकेट्स व २ चेंडू राखून पार केले. पण, या सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडून चूक झाली होती आणि त्यावर तात्काळ आयसीसीने कारवाईही केली होती. पाकिस्तानलाही याच चूकीचा फटका बसला होता. आता आयसीसीने पुढील कारवाईचा बडगा उगारला असून रोहित Super 4 मध्ये रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Asia Cup 2022, IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा ४ सप्टेंबरला एकमेकांना भिडणार, फायनलमध्येही टक्कर होणार; जाणून घ्या समीकरण
India vs Pakistan यांच्यातल्या पहिल्या लढतीत दोन्ही संघांनी षटकांचा वेग संथ ठेवला आणि त्यामुळे भारताला त्यांच्या अखेरच्या दोन षटकांत, तर पाकिस्तानला अखेरच्या तीन षटकांत ३० यार्डाच्या आत ५ खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी उभं करावं लागलं. भारताला शिक्षा झाली तेव्हा १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारने दोन विकेट्स घेत पाकिस्तानला संधीचं सोनं करू दिले नाही. पण, पाकिस्तानच्या अखेरच्या तीन षटकांत एक खेळाडू ३० यार्डाबाहेर कमी असल्याचा भारताला फायदा झाला. हार्दिक पांड्याने त्याचाच फायदा उचलून विजयी षटकार खेचला. आता आयसीसीने या दोन्ही संघांची ४० टक्के मॅच फी कापली आहे. आयसीसीचे मॅच रेफरी पॅनलचे जेफ क्रो यांनी ही शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार भारतीय संघाला १३.२० लाख, तर पाकिस्तानला ५.९२ लाख दंड भरावा लागला आहे. ( Indian team have been fined 13.20 Lakhs (INR) and Pakistani team have been fined 5.92 Lakhs (INR) for maintaining slow overrate in Asia Cup 2022)
रोहित शर्मा व बाबर आजम यांनी हा दंड मान्य केला आहे. पण, जर आजच्या सामन्यात रोहित शर्माकडून पुन्हा षटकांची गती संथ राहिली तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीची शिक्षा होऊ शकते. तसे झाल्यास Super 4 मध्ये भारत-पाकिस्तान लढतीला तो मुकण्याची शक्यता बळावेल. अ गटातील दोन अव्वल संघ Super 4 मध्ये ४ सप्टेंबरला एकमेकांना भिडणार आहेत आणि भारत-पाकिस्तान यांच्यातच हा सामना होण्याची ९९ टक्के शक्यता आहे. हाँगकाँगने अनपेक्षित निकाल लावल्यास समीकरण बदलू शकतं.
Web Title: India and Pakistan have been fined 40% of their match fees by referee Jeff Crowe for maintaining a slow over-rate in their Group A match of the Asia Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.