WTC Final India's 15-member squad : तीन दिवसांच्या सराव सामन्यानंतर भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) 15 सदस्यीय संघांची घोषणा केली. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली लंडन दौऱ्यासाठी बीसीसीआयनं 20 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यापैकी 15 जणांची निवड ही 18 जूनपासून सुरू होणाऱ्या WTC Final सामन्यासाठी करण्यात आली आहे. न्यूझीलंड संघानंही आजच या ऐतिहासिक सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला.
भारतानं रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिलला संधी दिली आहे. तर रिषभ पंत व वृद्धीमान सहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश केला गेला आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज या पाच जलदगती गोलंदाजांचा 15 खेळाडूंमध्ये समावेश केला आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संघात कायम आहे. अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरला बाकावर बसवले आहे. शार्दूल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.
न्यूझीलंडच्या ताफ्यात एकच फिरकीपटूअजाझ पटेल ( Ajaz Patel) हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे, तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे. डॉग ब्रेसवेल, जेकब डफ्फी, डॅरील मिचेल, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ही पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य होते. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी या खेळाडूंचे आभार मानले. डेव्हॉन कॉनवेय यानं इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक 306 धावा चोपल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ ( New Zealand squad for the WTC final:)केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग ( Kane Williamson (C), Tom Blundell, Trent Boult, Devon Conway, Colin De Grandhomme, Matt Henry, Kyle Jamieson, Tom Latham, Henry Nicholls, Ajaz Patel, Tim Southee, Ross Taylor, Neil Wagner, BJ Watling, Will Young.)
भारताचा संघ ( Team India announce their 15-member squad )रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्घीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज ( Rohit Sharma, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli (Captain), Ajinkya Rahane (vice-captain), Hanuma Vihari, Rishabh Pant (wicket-keeper), R. Ashwin, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah, Ishant Sharma, Mohammed Shami, Mohammed Siraj, Umesh Yadav, Wriddhiman Saha)