टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

वर्ल्ड कप खेळलेल्या बहुतांश सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:09 PM2023-11-20T22:09:43+5:302023-11-20T22:10:47+5:30

whatsapp join usJoin us
India announces squad for T20, Suryakumar Yadav to captain | टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India T-20 squad: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. वनडे वर्ल्डकप संपला, आता भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर BCCI ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केलाय. यात सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी आपला संघही जाहीर केला आहे. विश्वचषकातील बहुतांश खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली असून, नवीन खेळाडूंना संधी दिली गेली आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल, तर ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार करण्यात आले आहे. 

एकदिवसीय विश्वचषक-2023 मध्ये सूर्यकुमारने एकही अर्धशतक झळकावले नाही. त्याला अंतिम फेरीत मोठी खेळी खेळण्याची संधी होती, मात्र तो अपयशी ठरला. भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असले तरी तो सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळेच सूर्यकुमारकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक असतील
सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषकापर्यंतचा होता. द्रविड पुन्हा टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकतो, पण त्यासाठी त्याला पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. 

संबंधित बातमी-'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय

असा आहे संघ
सूर्यकुमार यादव(कर्णधार),ऋतुराज गायकवाड(उप-कर्णधार), इशान किशन, यशस्वी जयसवाल, टिळक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा(विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्सर पटेल, शिवमन दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार. श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात सामील होईल आणि त्याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली जाईल.

Web Title: India announces squad for T20, Suryakumar Yadav to captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.