अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टी-२० सामना सुरू होण्यासाठी आता काही मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. टी-२० मालिकेसाठी सर्व चाहते उत्सुक आहेत. त्यात आता चाहत्यांसाठी आणखी आनंदाची बातमी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या संपूर्ण टी-२० मालिकेत चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशननं याबाबतची माहिती दिली आहे. (India vs England T20 India Approves 50 Percent Of Stadium Capacity In England T20 Series)
गुजरात क्रिकेट असोसिएशननं एक परिपत्रक जारी केलं आहे. यात स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के चाहत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पण यासोबतच क्रिकेट चाहत्यांना कोरोना संबंधिचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. नियमांचे पालन होईल याकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्सचीही नियुक्त करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
संपूर्ण स्टेडियम सॅनिटाइज करण्यात आलं आहे आणि कोविड-१९ संबंधिचे सर्व नियमांचं स्टेडियम प्रशासनाकडून पालन करण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंडचा संघ : इयन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.