Join us  

विजयी मोहीम कायम राखण्यास भारत उत्सुक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज सलामी लढत

दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 6:09 AM

Open in App

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने वन-डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा ५-१ ने पराभव करीत इतिहास घडवला. आता टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील राहील. या मालिकेत सुरेश रैनाच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. तो वर्षभरानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करीत आहे.टी-२० मालिकेत युजवेंद्र चहल व कुलदीप यादव ही फिरकीपटूंची जोडी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची परीक्षा घेण्यास सज्ज आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिकेत टी-२० क्रिकेटबाबत चांगल्या आठवणी आहेत. भारताने पहिला टी-२० सामना २००६ मध्ये याच देशात खेळला होता. त्यानंतर वर्षभराने दक्षिण आफ्रिकेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वकप उंचावला होता. भारताने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आतापर्यंत १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यापैकी सात सामन्यांत विजय मिळवला.टी-२० मालिकेसाठी रैना, के. एल. राहुल आणि जयदेव उनाडकट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या तिघांनी शुक्रवारी सेंच्युरियनमध्ये सहाव्या वन-डेपूर्वी नेट््समध्ये दोन तास सराव केला. वाँडरर्समध्ये आज ऐच्छिक सराव सत्र होते.रैनाला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, पण त्याच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. कारण भारताला मार्च महिन्यात श्रीलंकेत टी-२० तिरंगी मालिका खेळायची आहे.प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, धोनी, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, के. एल. राहुल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर.दक्षिण आफ्रिका : जेपी ड्युमिनी (कर्णधार), फरहान बेहार्डिन, ज्युनियर डाला, एबी डिव्हिलियर्स, रिजा हेन्ड्रिक्स, ख्रिस्टियन जोनेकर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पीटरसन, आरोन फांगिसो, अँडी फेलुकवायो, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मिट््स.सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजल्यापासून.

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८