Join us  

विंडीजविरुद्ध भारत विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

सुनिल गावसकर लिहितात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 6:31 AM

Open in App

इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाºया कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका समजण्यासारखे नाही, पण व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बघता क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित असलेल्या संख्येने सामने आयोजित करणेही कठीण आहे. पाच सामने नाही, दोनऐवजी पण तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमुळे उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर मालिकेचा विजेता ठरण्यासाठी तिसरा सामना शिल्लक असतो.

पाच वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरच्या फेअरवेल मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या विंडीज संघाच्या तुलनेत यावेळचा संघ अधिक मजबूत आहे.काही टी२० स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही विंडीजची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. राजकोटची खेळपट्टी पाटा असेल तर भारतीय फिरकीपटूंना २०१३ प्रमाणे त्यांचा डाव सहजपणे गुंडाळता येणार नाही. ब्रेथवेट पॉवेल, शाई होप, सुनील अंबरीश हे चांगले आक्रमक फलंदाज आहे आणि तळाच्या फळीत जेसन होल्डर गोलंदाजांची परीक्षा घेण्यास सक्षम आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर विंडीजच्या फलंदाजांची कसोटी ठरेल, पण गत अनुभव लक्षात घेता दोन्ही कसोटी सामने खेळल्या जाणाºया खेळपट्ट्यांवर पहिल्या दिवसापासून चेंडू वळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. हैदराबादच्या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विंडीजचे वेगवान गोलंदाज विशेषता शॅनोन ग्रॅब्रिएल आणि केमार रोच यांना मदत मिळेल.दोघेही चांगला मारा करीत असून आणि अलीकडच्या काळात संथ झालेल्या विंडीजमधील खेळपट्ट्यांवरही त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. भारतीय खेळपट्ट्यांवरही त्यांच्याकडून विंडीज संघाला त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा आहे.भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल अपेक्षित आहे. मयंक अग्रवाल किंवा पृथ्वी साव राजकोटमध्ये पदार्पणाची कसोटी खेळणार आहे. आशिया कप स्पर्धेत खेळलेल्या एकमेव सामन्यात राहुलने फॉर्मात असल्याचे सिद्ध केले आहे. चेतेश्वर पुजाराला गृहमैदानावर मोठी खेळी करण्याची पुन्हा संधी आहे तर कर्णधार कोहली इंग्लंड दौºयात हुकलेल्या शतकांची उणीव येथे भरुन काढण्यासाठी सज्ज आहे.भारताने भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचा आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे. यामुळे निवड समितीसाठी कसोटी सामन्यांना महत्त्व नसल्याचे दिसून येते. दोन्ही गोलंदाजांना विश्रांती हवी आहे का, अशी विचारणा करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. विश्रांती द्यायची असल्यास मर्यादित षटकांच्या सामन्यात द्यायला हवी कसोटी सामन्यांत नाही. कसोटी क्रिकेटला वाचविण्यासाठी नेहमीच सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध असायला हवे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज यांना आॅस्ट्रेलिया दौºयात संघातील स्थान पक्के करण्याची संधी मिळाली आहे.भारताने इंग्लंड दौºयातील ओव्हल कसोटी सामन्यात पाच फलंदाज व पाच गोलंदाज या समीकरणाला तिलांजली देत सहा फलंदाजांना संधी हिली होती. अंतिम कसोटीत पंतने शानदार फलंदाजी केली. अश्विनने चारही कसोटी शतके विंडीजविरुद्ध झळकावले आहेत. भारतीय संघ पुन्हा पाच गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. २०१३ मध्ये विंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका भारतासाठी सोपी ठरली होती, यावेळची मालिका आॅस्ट्रेलिया दौºयापूर्वी भारतीय संघाची कसोटी पाहणारी ठरेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघ