भारत-आॅस्ट्रेलिया मालिका जुन्याच नियमानुसार, नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार

भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणा-या क्रिकेट मालिकेत जुन्याच नियमांचा अवलंब होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:44 AM2017-09-07T00:44:27+5:302017-09-07T00:45:50+5:30

whatsapp join usJoin us
 India-Australia series As per the old rules, new rules will be applicable from New Zealand's India tour. | भारत-आॅस्ट्रेलिया मालिका जुन्याच नियमानुसार, नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार

भारत-आॅस्ट्रेलिया मालिका जुन्याच नियमानुसार, नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणा-या क्रिकेट मालिकेत जुन्याच नियमांचा अवलंब होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार आहेत.
नव्या नियमांत आचारसंहिता, डीआरएसचा उपयोग आणि बॅटचा आकार आदींचा समावेश आहे. हे नियम १ आॅक्टोबरपासून लागू होणार होते पण दोन कसोटी सामने २८ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने हा निर्णय बदलण्यात आला. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात पाच वन डे आणि तीन टी-२० सामने खेळविले जातील.
स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला,‘नव्या नियमात पायचितच्या रेफ्रल पद्धतीत बदल करण्यात आला आहे. पंचासोबत गैरव्यवहार करणाºया खेळाडूला मैदानाबाहेर पाठविण्याचा अधिकार देखील आहे. (वृत्तसंस्था)
बॅटच्या अकाराचा नियम बदलण्यात आला असून फलंदाजाने क्रीज ओलांडल्यानंतर त्याची बॅट हवेत असेल तरी त्याला बाद दिले जाणार नाही. आधी अशा स्थितीत फलंदाज बाद ठरत होता.

Web Title:  India-Australia series As per the old rules, new rules will be applicable from New Zealand's India tour.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.