ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

India Vs Australia: भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 06:39 IST2025-03-31T06:38:24+5:302025-03-31T06:39:00+5:30

whatsapp join usJoin us
India-Australia series to resume in October-November, ODI and T20 thrills to come | ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न - भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल.

या मालिकेतील एकदिवसीय सामने दिवस-रात्र पद्धतीने रंगतील, तर टी-२० सामने रात्रीचे रंगतील. विशेष म्हणजे आगामी सत्रात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील सर्व आठ राज्यांत आणि क्षेत्रांमध्ये पुरुषांचे आंतरराष्ट्रीय सामने रंगणार आहेत.

कॅनबेरा आणि होबार्ट यांनी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या यजमान पदासाठी तयारी दर्शवली आहे. त्याआधी, पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे एकदिवसीय सामन्यांचे आयोजन होईल. 

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक 
एकदिवसीय सामने (सर्व दिवस-रात्र)
१९ ऑक्टोबर : पर्थ स्टेडियम
२३ ऑक्टोबर : अॅडलेड
ओव्हल
२५ ऑक्टोबर : एससीजी, सिडनी

टी-२० सामने (सर्व सामने रात्री)
२९ ऑक्टोबर : कॅनबेरा
३१ ऑक्टोबर : एमसीजी, मेलबोर्न
२ नोव्हेंबर : होबार्ट
६ नोव्हेंबर : गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर : गाबा, ब्रिस्बेन

महिला संघही करणार दौरा
भारताचा महिला संघही ऑस्ट्रेलिया दौरा करणार असून या दौऱ्यात तिन्ही प्रकारचे सामने खेळविण्यात येतील. भारतीय महिलांचा हा आव्हानात्मक दौरा १५ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान रंगणार असून यावेळी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळविण्यात येईल. या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना ६ ते ९ मार्चदरम्यान वाका येथे खेळविण्यात येईल. 

महिला दौऱ्याचे वेळापत्रक
टी-२० सामने :
१५ फेब्रुवारी : एससीजी, सिडनी
१९ फेब्रुवारी : कॅनबेरा
२१ फेब्रुवारी : अॅडलेड ओव्हल
एकदिवसीय सामने :
२४ फेब्रुवारी : अॅलेन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
२७ फेब्रुवारी : बेलरीव ओव्हल, होबार्ट
१ मार्च : सिटीपॉवर सेंटर, मेलबोर्न
कसोटी सामना : ६ ते ९ मार्च: वाका, पर्थ (दिवस-रात्र)

 

Web Title: India-Australia series to resume in October-November, ODI and T20 thrills to come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.