ICC Players of the Month : येऊन येऊन येणार कोण? Shreyas Iyer शिवाय आहेच कोण?; भारतीय फलंदाजानं पटकावला ICCचा पुरस्कार

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने  सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:10 PM2022-03-14T16:10:01+5:302022-03-14T16:10:24+5:30

whatsapp join usJoin us
India batter Shreyas Iyer and star New Zealand all-rounder Amelia Kerr have been voted ICC Players of the Month for February 2022 | ICC Players of the Month : येऊन येऊन येणार कोण? Shreyas Iyer शिवाय आहेच कोण?; भारतीय फलंदाजानं पटकावला ICCचा पुरस्कार

ICC Players of the Month : येऊन येऊन येणार कोण? Shreyas Iyer शिवाय आहेच कोण?; भारतीय फलंदाजानं पटकावला ICCचा पुरस्कार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने  सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक खेळी केली. डे नाईट कसोटीत दोन्ही डावांत 50+ धावा करणारा तो भारताचा पहिला व जगातील चौथा फलंदाज ठरला. याआधी श्रेयसने वेस्ट इंडिज व श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दबदबा गाजवला होता. त्यामुळेच ICCने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून त्याचा गौरव केला. ( Shreyas Iyer have been voted ICC Players of the Month for February 2022) 

२७ वर्षीय श्रेयसने बंगळुरू येथेल पिंक बॉल कसोटीत पहिल्या डावात ९२ आणि दुसऱ्या डावात ६३ धावांची खेळी केली. त्याआधी त्याने वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्याविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली. या पुरस्काराच्या शर्यतीत श्रेयससह यूएईचा फलंदाज विरीत्या अऱविंद व नेपाळचा अष्टपैलू दिपेंद्र सिंग ऐरी हेही होते.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात श्रेयसने ८० धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. त्याआधी त्याने ट्वेंटी-२० लढतीत १६ चेंडूंत २५ धावा कुटल्या होत्या. 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. तीन सामन्यांच्या मालिकेत २७ वर्षीय श्रेयसने १७४च्या स्ट्राईकरेटने २०४ धावा केल्या. श्रीलंकेला एकदाही श्रेयसला बाद करता आले नाही. या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यरने  आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत २७ स्थानांची झेप घेतली आहे.  श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने सलग तीन ५०+ धावा केल्या. एका ट्वेंटी-२० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्तान), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.

श्रेयस अय्यरने या मालिकेत १७४.३५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद २०४ धावा केल्या. श्रीलंकेला तीन सामन्यांच्या मालिकेत श्रेयसला एकदाही बाद करता आले नाही. त्याने या मालिकेत ५७*, ७४* व ७३* अशी खेळी केली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २००+ धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. त्याने विराटचा ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१६) १९९ धावांचा विक्रम मोडला. 


श्रेयस अय्यरची फेब्रुवारी महिन्यातील कामगिरी
 - Man Of The Match  वि. वेस्ट इंडिज, तिसरी वन डे  
- Man Of The Match वि. श्रीलंका, दुसरी ट्वेंटी-२०
- Man Of The Match वि. श्रीलंका, तिसरी ट्वेंटी-२०
- Man Of The Series वि. श्रीलंका ट्वेंटी-२० मालिका
- ICC Men's Player Of The Month 

Web Title: India batter Shreyas Iyer and star New Zealand all-rounder Amelia Kerr have been voted ICC Players of the Month for February 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.