वेलिंग्टन (न्यूझीलंड) - एकापाठोपाठ एक अशा विजयाची पताका फडकवीत असलेल्या भारतील संघाने शुक्रवारी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगला देशचा १३१ धावांनी पराभव करीत सेमीफायनलमध्ये धडक दिली. अंडर-19 विश्वचषकात बांगलादेशचा तब्बल 131 धावांनी पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महत्वाचं म्हणजे उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच कालावधीपासून सामना रंगलेला नाही. त्यामुळे या दोन्ही संघांमधील काँटे की टक्कर क्रिकेट रसिकांना मंगळवारी पहायला मिळणार आहे.
बांगला देशविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर मनोज कालरा नऊ धावांवर बाद झाल्यानंतर, कर्णधार पृथ्वी शॉने शुभम गिलच्या सोबतीने डाव पुढे नेला. पृथ्वी शॉ ४० धावांवर बाद झाला तर शुभमने ८६ धावांची खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. अभिषेक शर्मानेही अर्धशतक ठोकून संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. भारताने ४९.२ षटकांत सर्व गडी गमावून २६५ धावा फळ्यावर लावल्या. बांगलादेशतर्फे काझी ओनिकने ४८ धावांमध्ये भारताच्या तीन फलंदाजांना माघारी पाठविले तर नईम हसन आणि सैफ हसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताची एकवेळ ४ बाद २१५ अशी भक्कम स्थिती होती. पण मंदगती खेळपट्टीवर भारताने अखेरचे ६ फलंदाज ५० धावांत गमावले. भारतीय गोलंदाजांनीही चोख भूमिका वठवीत बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सलामीवीर पिनाक घोषचा (४३ धावा) अपवाद वगळता अन्य फलंदाज छाप पाडू शकले नाही. बांगलादेशचा डाव १३४ धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारतातर्फे कमलेश नागरकोटीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. अभिषेक शर्मा आणि शिवम मावी या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीसेमीफायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी ३० जानेवारी रोजी होणार आहे. बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवीत खेळाडूंनी भारतीय चाहत्यांना गणराज्यदिनाची शानदार भेट दिली. भारतीय फलंदाजांना स्थिरावून खेळण्याची सवय लावण्याचे काम कोच राहुल द्रविड यांना करावे लागणार आहे. पाकचा गोलंदाजी मारा कैकपटींनी चांगला असून फलंदाजदेखील फॉर्ममध्ये आहेतसंक्षिप्त धावफलकभारत ४९.२ षटकांत सर्वबाद २६५ धावा.(पृथ्वी शॉ ४०, शुभम गिल ८६, हार्विक देसाई ३४, अभिषेक शर्मा ५०, इस्लाम ३/४८, नईम २/३६, हसन २/४१.) बांगला देश : ४२.१ षटकांत सर्वबाद १३४ धावा.(पी. घोष ४३, नागरकोटी ३/१८, मावी २/२७, शर्मा २/११).