Join us  

Smriti Mandhana : स्मृती मानधनाची वादळी खेळी, थोडक्यात हुकले शतक; पण भारताला मिळवून दिला दणदणीत विजय

India beat England by 7 wickets in the first WODI - भारतीय महिलांनी पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:13 PM

Open in App

India beat England by 7 wickets in the first WODI - भारतीय महिलांनी पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे आणि तिला विजयी निरोप देण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करू, असा निर्धार स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) व्यक्त केला होता आणि तिने पहिल्या वन डेत खेळही तसाच केला. शतक थोडक्यात हुकल्याने चाहते मात्र निराश झाले. यास्तिका भाटीया व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही अर्धशतकी खेळी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.

ट्वेंटी-२० मालिकेत इंग्लंडच्या महिला संघाने विजय मिळवला, परंतु वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय महिलांनी दणका दिला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७ बाद २२७ धावा केल्या. अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका खेळणाऱ्या झुलन गोस्वामीने १०-२-२०-१ अशी दमदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने ( २-३३) सर्वाधिक विकेट्स घेतल्या. डॅनी वॅट ( ४३), एलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स ( ५०), सोफी एक्लेस्टन ( ३१), सोफी डंक्ली ( २९) व चार्ली डीन ( २४) यांनी योगदान दिले. 

प्रत्युत्तरात शेफाली वर्मा ( १) दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर मानधना व यास्तिका यांनी ९६ धावांची भागीदारी केली. यास्तिका ४७ चेंडूंत ८ चौकार १ षटकारासह ५० धावा केल्या. मानधनाने ९९ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ९१ धावा केल्या. मानधनाच्या फटकेबाजीमुळे भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला गेला. शतक हुकल्याने मानधना नाराज दिसली. हरमनप्रीत कौरने नंतर ९४ चेंडूंत ७ चौकार १ षटकारासह नाबाद ७४ धावा करताना ४४.२ षटकांत ३ बाद २३२ धावा करून विजय निश्चित केला. 

धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने ३२ डावांत ५९.६९च्या सरासरीने ११५२ दावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. नर्व्हस ९०मध्ये स्मृती चौथ्यांदा बाद झाली आहे आणि मिताली राज ( ५) हिच्यानंतर ती सर्वाधिक नर्व्हस ९०मध्ये बाद होणारी भारतीय महिला ठरली. 

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघझुलन गोस्वामीभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App