विजयवाडा : फिरकीपटू कर्ण शर्मा व शहाबाज नदीम यांच्या फिरकी मा-याच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने मंगळवारी न्यूझीलंड ‘अ’ संघाचा एक डाव २६ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्यांच्या अनौपचारिक मालिकेत २-० ने सरशी साधली.
पहिल्या डावात २११ धावांची मजल मारणाºया पाहुण्या संघाने आज अखेरच्या दिवशी १ बाद १०४ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण त्यांचा दुसरा डाव केवळ २१० धावांत संपुष्टात आला. भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात ४४७ धावांची मजल मारली होती.
लेगस्पिनर कर्ण शर्मा (२०.३ षटकांत ७८ धावांत ५ बळी) आणि डावखुरा फिरकीपटू नदीम (२६ षटकांत ४१ धावांत ४ बळी) यांनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे न्यूझीलंडने १०६ धावांच्या मोबदल्यात ९ विकेट गमावल्या. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने १ बळी घेतला. पहिल्या लढतीत ८ बळी घेणाºया रेल्वेच्या कर्णने पुन्हा एकदा या लढतीत १२९ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले. न्यूझीलंड ‘अ’ संघातर्फे हेन्री निकोल्सचा (९४) अपवाद वगळता, अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. रावल व निकोल्स यांनी दुसºया विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र ३० पेक्षा अधिक धावांची एकही भागीदारी झाली नाही.
भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाला पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव ३१ धावांनी पराभूत केले होते. त्यांच्या फलंदाजांकडे कर्ण-नदीम या फिरकी जोडीच्या गोलंदाजीचे कुठलेही उत्तर नव्हते. कर्णने या मालिकेत १६, तर नदीमने १४ बळी घेतले. (वृत्तसंस्था)
Web Title: India 'A' beat New Zealand 'A' by 26 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.